17.5 C
Latur
Sunday, November 24, 2024
Homeउद्योगबजाज फायनान्सच्या कर्ज वितरणावर बंदी

बजाज फायनान्सच्या कर्ज वितरणावर बंदी

नवी दिल्ली : जर तुम्ही बजाज फायनान्सचे ग्राहक असाल तर ही बातमी तुमच्यासाठी महत्त्वाची आहे. सेंट्रल रिझर्व्ह बँकेने बजाज फायनान्सच्या ईकॉम आणि इन्स्टा ईएमआय कार्डला कर्ज मंजूर करणे आणि कर्ज वितरण करण्यावर बंदी घातली आहे.

रिझर्व्ह बँकेने जारी केलेल्या निवेदनानुसार, रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया कायदा, १९३४ च्या कलम ४५ एल (१) (बी) अंतर्गत, बजाज फायनान्स लिमिटेडला कर्ज मंजूरी आणि वितरण थांबविण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. त्यामुळे ग्राहकांना आता ईकॉम आणि ईएमआय कार्ड वरुन कर्ज मिळणार नाही. रिझर्व्ह बँकेचा हा आदेश ईकॉम आणि इन्स्टा ईएमआय कार्ड या बजाज फायनान्सच्या दोन कर्ज उत्पादनांना लागू होईल. रिझर्व्ह बँकेच्या म्हणण्यानुसार, कंपनीने डिजिटल कर्ज मार्गदर्शक तत्त्वांच्या तरतुदींचे पालन केले नाही. अलीकडेच आरबीआयने बँका आणि एनबीएफसीसाठी आयटी गव्हर्नन्स आणि नियंत्रणाशी संबंधित सर्वसमावेशक मार्गदर्शक तत्त्वे जारी केली आहेत. आयटी गव्हर्नन्समध्ये जोखीम व्यवस्थापनासह इतर व्यवस्थापनाचा समावेश होतो. या संदर्भात, रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने मार्गदर्शक तत्त्वे, २०२३ जारी करण्यात आली आहेत. नवीन मार्गदर्शक तत्त्वे १ एप्रिल २०२४ पासून लागू होतील.

बजाज फायनान्सच्या शेअर्समध्ये घसरण
आरबीआयचा हा आदेश शेअर बाजार बंद झाल्यानंतर आला आहे, मात्र आजच्या ट्रेडिंग सत्रात बजाज फायनान्सच्या शेअरमध्ये मोठी घसरण पाहायला मिळाली आहे. आज बजाज फायनान्सचा शेअर ३.९३ टक्क्यांनी घसरून ६९४० रुपयांच्या पातळीवर आला आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR