20.9 C
Latur
Wednesday, January 22, 2025
Homeसोलापूरहानिकारक औषध विक्री करणाऱ्यांवर बंदी आणा : संभाजी आरमार

हानिकारक औषध विक्री करणाऱ्यांवर बंदी आणा : संभाजी आरमार

सोलापूर : सोलापूर जिल्हा ज्वारी, ऊस आणि डाळिंब, द्राक्ष फळांच्या उत्पादनासाढी संपूर्ण देशभरात प्रसिद्ध असून या पिंकांचे उत्पादन जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात होते. निसर्गावर अवलंबून असणारा शेतकरी मागील अनेक वर्षांपासून अवकाळी पाऊस, दुष्काळाला सामोरे जात आपली पिके जोपासत तुटपुंज्या उत्पन्नावर आपली गुजराण करत आहेत. अशा सर्व कठीण परिस्थितीला तोंड देत असताना हत्तूर, तालुका दक्षिण येथील द्राक्ष उत्पादक शेतकरी सुरेश सोमनिंग काळे यांनी डाउनी रोगावर नियंत्रण मिळवण्यासाठी सोरेगाव येथील कमल ऍग्रो या औषध विक्रेत्याकडून ङं८ इीी इ्रङ्म – ड१ँल्ल्रू२ ढ५३. छ३ ि चे डाऊनी रेझ नावाचे औषध घेतले होते.

सदरचे औषध विक्रेत्याच्या सल्ल्यानंतर योग्य पद्धतीने फवारणी केल्यानंतर दुसऱ्या दिवशी दोन एकर बागेतील संपूर्ण द्राक्षांच्या झाडावरील द्राक्ष-घडे जळून गेलेली आहेत. तत्परतेने निकृष्ट दर्जाचे हानिकारक औषध पुरविणाऱ्या विक्रेते आणि कंपनीला कळविले असता कर्जे काढून बाग जोपासणाऱ्या शेतकरी सुरेश काळे यांच्या द्राक्ष बागेतील संपूर्ण फळांचे जळून नुकसानीची कोणतीही योग्य दखल न घेता बेजबाबदारपणे हात झटकले आहेत.

काळे कुटुंबीय शेतकरी औषध फवारणीनंतर अशी नुकसानदायी परिस्थिती अचानकपणे उदभवल्याने प्रचंड आर्थिक संकटात सापडली असून रात्रंदिवस लहान मुलांसारखे जोपासलेल्या बागेचे मानवनिर्मित निकृष्ट दर्जाच्या औषधांमुळे झालेले नुकसान पाहता मानसिक विवंचनेतही सापडले आहे असे जिल्ह्यात अनेक ठिकाणी झालेले प्रकार पाहता सखोल चौकशीनंतर निकृष्ट दर्जाचे हानिकारक औषध विक्री करणाऱ्या विक्रेते आणि उत्पादक कंपन्यांवर कायदेशीर कडक कारवाई करून बंदी आणावी व त्याचबरोबर नुकसान झालेल्या शेतकरी सुरेश सोमनिंग काळे या शेतकऱ्याला त्याची योग्य ती नुकसान भरपाई तातडीने मिळावी. यासाठी सोलापूर जिल्हाधिकारी कुमार आर्वाद यांना निवेदन देण्यात आले यावेळी तत्परतेने जिल्हा कृषिअधिकारी यांचेशी संपर्क करून त्वरित चौकशी करून अहवाल सदर करण्याच्या सूचना दिल्या यावेळी जिल्हाप्रमुख अनंतराव नीळ, उपशहरप्रमुख राज जगताप, रिक्षा संघटना उपशहरप्रमुख सचिन लंगाळे, प्रभाग प्रमुख विकी ठेंगले, प्रणव काळे, रमेश काळे, मलकारी काळे आदीजण उपस्थित होते.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR