नवी दिल्ली : ख्रिसमसच्या सुटीसोबतच बँकांना मोठी सुट्टी मिळणार आहे. सलग पाच दिवस बँका बंद राहणार आहेत. चौथ्या शनिवारमुळे २३ डिसेंबरला बँका बंद राहणार आहेत. यानंतर रविवार आहे. ख्रिसमसनिमित्त सोमवारी देशभरातील बँका बंद राहणार आहेत. २६ आणि २७ डिसेंबरला अनेक राज्यांमध्ये ख्रिसमसच्या निमित्ताने बँकांना सुट्टी असेल. अशा स्थितीत पाच दिवसांच्या सुट्टीमुळे नागरिकांना गैरसोयीचा सामना करावा लागू शकतो.
मिळालेल्या माहितीनुसार, काही राज्यांमध्ये ख्रिसमसमुळं बँकांना सलग पाच दिवस सुट्टी असणार आहे. यावर्षीचे फक्त ९ दिवस उरले आहेत. यापैकी काही राज्यांमध्ये ७ दिवस बँकांना सुट्ट्या असणार आहेत. अशा परिस्थितीत तुम्हाला बँकेशी संबंधित कोणतेही महत्त्वाचे काम पूर्ण करायचे असेल तर ते शुक्रवारीच करून घ्यावे लागणार आहे. नंतर अडचणींचा सामना करावा लागणार नाही.