बंगळूरू : विराट कोहली आणि देवदत्त पडीकक्ल या जोडीने केलेल्या अर्धशतकी आणि वादळी खेळीच्या जोरावर रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुने घरच्या मैदानात पाहुण्या राजस्थान रॉयल्ससमोर २०६ धावांचे अवघड आव्हान ठेवले होते. आरसीबीने २० ओव्हरमध्ये ५ विकेट्स गमावून २०५ धावा केल्या. दरम्यान राजस्थान जिंकण्याच्या उंबरठ्यावर असताना आरसीबीने राजस्थानच्या तोंडचा घास पळवित घरच्या मैदानावर पहिला विजय मिळविला. तर आरसीबीसाठी विराटने सर्वाधिक ७० धावांचे योगदान दिले. तर देवदत्तने अर्धशतकी खेळी केली.
रॉयल चॅलेंजर्सं बंगळुरुने आयपीएलच्या १८ व्या मोसमात अखेर घरच्या मैदनातील सलग ३ पराभवानंतर विजयाचे खाते उघडले आहे. आरसीबीने ४२ व्या सामन्यात राजस्थान रॉयल्सवर ११ धावांनी मात करत एकूण सहावा विजय मिळवला. आरसीबीने बंगळुरुतील एम चिन्नास्वामी स्टेडियममध्ये राजस्थान रॉयल्सला विजयासाठी २०६ धावांचे आव्हान दिले होते. मात्र जोश हेझलवूड याने केलेल्या चिवट गोलंदाजीसमोर राजस्थानला २० ओव्हरमध्ये ९ विकेट्स गमावून १९४ धावाच करता आल्या. राजस्थानचा हा या मोसमातील सलग पाचवा आणि तर एकूण सातवा पराभव ठरला. यासह राजस्थानचे या हंगामातील आव्हान जवळपास संपुष्ठात आले आहे.
शुक्रवारी बंगळुरूमध्ये, आरआरने नाणेफेक जिंकून गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. आरसीबीने ५ विकेट गमावल्यानंतर २०५ धावा केल्या. प्रत्युत्तरात, राजस्थानला ९ विकेट्स गमावल्यानंतर फक्त १९४ धावा करता आल्या. यशस्वी जैस्वालने ४९ आणि ध्रुव जुरेलने ४७ धावा केल्या. संदीप शर्माने २ विकेट घेतल्या. बंगळुरूकडून विराट कोहली आणि देवदत्त पडिक्कल यांनी अर्धशतके झळकावली. कृणाल पंड्याने २ विकेट घेतल्या.