35.8 C
Latur
Monday, May 20, 2024
Homeलातूरसोमवारपासून विकसित भारत संकल्प यात्रा

सोमवारपासून विकसित भारत संकल्प यात्रा

लातूर : प्रतिनिधी
लातूर जिल्हा परिषदेच्या व पंचायत समितीच्या स्तरावर विकसीत भारत संकल्प यात्रेचा शुभारंभ सोमवार दि. २० नोव्हेंबर रोजी होणार आहे. यावेळी त्या-त्या विभागाशी संबंधित लाभार्थ्यांना सन्मानपत्र, मंजुरी प्रलंबित असल्यास मंजुरी आदेश देण्यात येणार आहेत. भारत सरकारच्या फ्लैगशिप योजनांचे लाभ लाभार्थ्यापर्यंत वेळेत पोहोचावेत यादृष्टीने केंद्र शासनाने राज्य, केंद्र शासित प्रदेशांच्या सहकार्याने ग्राम स्वराज अभियान व विस्तारीत ग्राम स्वराज अभियान राबविले आहे. अद्यापही ज्या योजनांचे लाभ लाभार्थ्यापर्यंत पोहोचलेले नाहीत, अशा लाभार्थ्यांपर्यंत पोहोचण्याच्या उद्देशाने, विकसित भारत संकल्प यात्रा या नावाची देशव्यापी मोहीम केंद्र शासनाकडून दि. १५ नोव्हेंबर ते दि. २६ जानेवारी या कालावधीत राबविण्यात येणार आहे. जिल्हा परिषदेच्या स्तरावर विकसीत भारत संकल्प यात्रेचा शुभारंभ सोमवार दि. २० नोव्हेंबर रोजी होणार आहे.

विकसीत भारत संकल्प यात्रेच्या निमित्ताने विविध योजनांतर्गत पात्र असलेल्या परंतु आतापर्यंत लाभ न घेतलेल्या लोकांपर्यंत पोहोचणे, माहितीचा प्रसार आणि योजनांबद्दल जागरूकता निर्माण करणे, नागरिकांशी संवाद वैयक्तिक कथा, अनुभव शेअरिंगद्वारे सरकारी योजनांच्या लाभार्थ्यांशी संवाद साधणे. यात्रे दरम्यान निश्चित केलेल्या तपशीलांद्वारे संभाव्य लाभार्थ्यांची नोंदणी करण्यात येणार आहे. सदरील विकसित भारत संकल्प यात्रेच्या कालावधीत झालेल्या चांगल्या कामाची यशोगाथा बुकलेट स्वरुपात तयार केली जाणार आहे. योजनेची प्रभावी अंमलबजावणी करण्यात येणा-या अडचणी व त्यावर उपाययोजना, तक्रारीचे निवारण, प्रलंबित मंजुरी, लाभार्थीची नोंदणी करणे, बंद पडलेल्या योजना सुरु करणे, कंत्राटदार व सरपंच यांचेमध्ये समन्वय साधणे, जागेचे प्रश्न सोडविणे इ. बाबीची लाभार्थी व गट विकास अधिकारी यांच्याशी समन्वय साधून लक्ष्य साध्य करण्यासाठी प्रयत्न केले जाणार आहेत.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR