27.5 C
Latur
Saturday, September 21, 2024
Homeसोलापूरविकास कामाचे माजी उपनगराध्यक्ष सोमनाथ चिवटे यांच्या हस्ते भूमिपूजन

विकास कामाचे माजी उपनगराध्यक्ष सोमनाथ चिवटे यांच्या हस्ते भूमिपूजन

करमाळा : शहरातील विविध कामासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे मोठ्या प्रमाणावर निधी देत असून ठेकेदारांनी मात्र चांगल्या दर्जाची कामे करून करमाळ्याच्या विकासात भर घालावी असे आव्हान जिल्हा प्रमुख महेश चिवटे यांनी केले.

करमाळा शहरातील राशिन पेठ मधील अंतर्गत गटारी बांधणी 30 लाख रुपये व डांबरीकरण रस्ता करणे वीस लाख रुपये या कामाची भूमिपूजन मंडळाचे मार्गदर्शक सोमनाथ चिवटे यांच्या नारळ फोडून झाले. यावेळी माजी नगरसेवक ललित अग्रवाल प्रसिद्ध व्यापारी नितीन शेयाळ रमेश भंडारे उद्धवशेठ उतारी संतोष किरवे मनोज किरवे संतोष उतारी रमेश् होरणे राजेंद्र वाशिंबे कर रमेश भंडारी बंडू शेठ पारडकर देविदास चिवटे उमेश अग्रवाल गणेश बागडे शिवसेना नेते संजय शीलवंत (पाटील)उपजिल्हाप्रमुख अनिल पाटील उपस्थीत होते.

गेली 25 वर्षापासून गटारी तुंबल्यामुळे अनेक समस्यांना नागरिकांना सामोरे जावे लागत होते .हे काम मार्गी लागल्यामुळे राशीन पेठे त स्वच्छता निर्माण होईल असा विश्वास येथील नागरिक व सामाजिक कार्यकर्ते संतोष किरवे यांनी व्यक्त केला आहे

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR