22.5 C
Latur
Thursday, October 24, 2024
Homeमहाराष्ट्रबिचुकलेंची लढत थेट राजघराण्याशी

बिचुकलेंची लढत थेट राजघराण्याशी

सातारा : प्रतिनिधी
बिग बॉस फेम अभिजीत बिचुकले हे पुढील दोन दिवसात उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. यावेळी त्यांनी सातारा-जावळी मतदारसंघ निवडला आहे. अभिजीत बिचुकले यांची उमेदवारी लढवण्याची ही चौथी टर्म आहे. यावेळी ते सातारा जावळीचे आमदार शिवेंद्रराजे भोसले यांच्या विरोधात उमेदवारी लढवणार असल्याची माहिती त्यांनी स्वत: दिली आहे.

यावेळी त्यांनी आपण निवडणूक का लढवत आहोत? याबाबतची माहिती दिली. अभिजीत बिचुकले निवडून आले तर नवीन उमेद येईल. नवीन आशा येईल. नवीन धोरणे येतील आणि महाराष्ट्रात साता-याचा डंका वाजेल असा दावा बिचुकले यांनी केला आहे. २०१९ च्या विधानसभा निवडणुकीत वरळी मध्ये माझी आदित्य ठाकरे यांच्यासोबत लढत झाली होती. आता सातारा जावळी मतदारसंघांमध्ये मतदारांना सुवर्णसंधी देत आहे. २००४ पासून सलग चार टर्म मी ही निवडणूक लढत आहे.

विकासाच्या दृष्टीने विद्यमान आमदार शिवेंद्रराजे भोसले आणि बिचुकले अशी लढत पाहायला मिळेल. सर्व सातारकरांनी मागील वेळी ज्याप्रमाणे उदयनराजेंचा पराभव केला होता त्याप्रमाणे आता मला विधानसभेत निवडून द्या, असे आवाहन अभिजीत बिचुकले यांनी केले आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR