26.1 C
Latur
Friday, December 8, 2023
Homeमनोरंजनबिग बी आणि रजनीकांत ३३ वर्षांनी दिसणार एकत्र

बिग बी आणि रजनीकांत ३३ वर्षांनी दिसणार एकत्र

साऊथ सुपरस्टार रजनीकांत आणि महानायक अमिताभ बच्चन त्यांच्या ‘थलाइवर १७०’ हा चित्रपट सध्या चर्चेत आहे. हे दोन्ही दिग्गज कलाकार तब्बल ३३ वर्षानंतर एकत्र काम करताना दिसणार आहेत. दरम्यान, या चित्रपटाच्या सेटवरील एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे ज्यामध्ये या दोन्ही दिग्गजांचा एकत्र फोटो दिसत आहे.

दोन दिग्गज एकत्र
रजनीकांत आणि अमिताभ यांचा फोटो समोर येताच सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. दोन्ही स्टार्स शॉट्स दरम्यान फोन स्क्रीनकडे पाहताना दिसत आहेत. यावेळी अमिताभ पांढऱ्या शर्ट आणि ग्रे कोटमध्ये दिसत आहेत तर रजनीकांतने तपकिरी रंगाचा शर्ट घातला होता. या दोघांचा फोटो शेअर करत लायका प्रॉडक्शनने कॅप्शनमध्ये लिहिलंय की, “जेव्हा सुपरस्टार आणि शहेनशाह ३३ वर्षांनंतर ‘थलाइवर १७०’ च्या सेटवर भेटले!”

 

‘हम’ चित्रपटामध्ये दोघे दिसले होते एकत्र
अमिताभ बच्चन आणि रजनीकांत यांनी १९९१ मध्ये मुकुल आनंद दिग्दर्शित ‘हम’ चित्रपटात शेवटचे एकत्र काम केले होते. या चित्रपटात दोघांनी भावाची भूमिका साकारली होती. दरम्यान, आता ३३ वर्षानंतर हे दोघे पुन्हा एकत्र दिसणार आहेत. या नवीन चित्रपटाचे दिग्दर्शन जय भीम फेम टीजे ज्ञानवेल यांनी केले आहे. अभिनेता फहद फासिल आणि राणा दग्गुबती हे देखील दिसणार आहेत.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR