22.1 C
Latur
Friday, September 5, 2025
Homeमनोरंजनलालबागच्या राजाला ‘बिग बी’कडून दान

लालबागच्या राजाला ‘बिग बी’कडून दान

मुंबई : दरवर्षीप्रमाणे यंदाही गणेशोत्सव मोठ्या थाटात आणि उत्साहात पार पडला. मुंबईतील लालबागमधील प्रसिद्ध आणि नवसाला पावणारा अशी ख्याती असलेल्या लालबागचा राजाचे अनेक सेलिब्रिटींनी दर्शन घेतले. लालबागचा राजावर भक्तांची मनोभावे श्रद्धा आहे. त्यामुळे दरवर्षी राजाला कोट्यवधींचे दान मिळते. यंदाही लालबागच्या राजाला भाविकांनी भरभरुन दान दिले आहे. यामध्ये बिग बी अमिताभ बच्चन यांचेही नाव समोर आले आहे.

अमिताभ बच्चन यांनी लालबागचा राजाला लाखोंचे दान दिले आहे. याचा व्हीडीओ समोर आला आहे. विरल भय्यानी या इन्स्टाग्राम पेजवरुन राजाच्या दरबारातून एक व्हीडीओ समोर आला आहे. यामध्ये लालबागचा राजा मंडळाचे सेक्रेटरी सुधीर साळवी यांच्या हातात एक चेक दिसत आहे. हा चेक अमिताभ बच्चन यांनी पाठवल्याचे म्हटले गेले आहे. यानुसार, अमिताभ बच्चन यांनी लालबागचा राजाला तब्बल ११ लाख रुपयांचे दान दिले आहे. पण, लालबागच्या राजाच्या चरणी ११ लाख रुपयांचे दान दिल्याने नेटक-यांनी नाराजी दर्शविली आहे. अनेकांनी विरल भय्यानीच्या या व्हीडीओवर कमेंट केल्या आहेत.

पंजाबला मदत केली असती तर जास्त आनंद झाला असता पुरामुळे नुकसान झालेल्या ५०० कुटुंबाना मदत करा, जिथे गरज आहे तिथे पैसे डोनेट करा अशा अनेक कमेंट चाहत्यांनी केल्या आहेत.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR