५० वर्षात महाराष्ट्रासह देशातील जन्मदरात मोठी घट

नवी दिल्ली : वृत्तसंस्था
गेल्या पाच दशकांत देशभरात जन्मदरात मोठी घट झाली. १९७१ मध्ये देशाचा जन्मदर ३६.९ होता. तो २०२३ मध्ये १८.४ झाला आहे. महाराष्ट्रात ही घट अधिक तीव्र आहे. देशाच्या ग्रामीण भागात २०१३ मधील २२.९ वरून २०२३ मध्ये २०.३ तर शहरी भागात २०१३ मधील १७.३ वरून २०२३ मध्ये १४.९ जन्मदर झाला आहे.

बिहारमध्ये सर्वाधिक जन्मदर २५.८ असून, अंदमान-निकोबारमध्ये सर्वांत कमी १०.१ जन्मदर आहे. महाराष्ट्रात अवघ्या पाच वर्षांत जन्मदर तब्बल २.३ अंकांनी घसरला आहे.

चंदीगडमध्ये सर्वांत कमी ४ आणि छत्तीसगडमध्ये सर्वाधिक ८.३ मृत्यूदर नोंदवला गेला आहे. महाराष्ट्रातील मृत्यूदर ६.१ आहे, असे केंद्र सरकारच्या एसआरएस अहवालातून दिसून आले.

केंद्र, राज्य सरकारकडून राबविण्यात येत असलेल्या विविध आरोग्य योजना, जनजागृती व कुटुंब नियोजनाचा सकारात्मक परिणाम म्हणून भारतातील बालमृत्यू दर २५ च्या विक्रमी नीचांकी पातळीवर पोहोचला आहे. २०१३ मध्ये हा दर ४० होता. म्हणजे गेल्या दहा वर्षांत यात ३७.५ टक्क्यांची घट झाली आहे. महाराष्ट्रातील बालमृत्यू दर फक्त १४ वर आला आहे.
चौकट
बालमृत्यू सर्वाधिक कुठे?
१९७१ मध्ये देशातील बालमृत्यूदर १२९ होता, जो २०२३ मध्ये फक्त २५ झाला. म्हणजे यात ८०% घट झाली आहे. मध्य प्रदेश, छत्तीसगड व उत्तर प्रदेशमध्ये बालमृत्यू दर सर्वाधिक ३७ आहे. मणिपूरमध्ये सर्वांत कमी म्हणजे ३ इतका दर. केरळ हे एकमेव मोठे राज्य आहे जिथे एक अंकी दर नोंदविण्यात आला आहे.

Hot this week

नांदेडात एकाच दिवशी दोन अधिकारी निलंबित

नांदेड : महापलिकने हाती घेतलेल्या १०० दिवस विशेष कार्यक्रमात...

कोलकात्याकडून दिल्ली पराभूत

दिल्ली : कोलकाता नाईट रायडर्स टीम अखेर विजयी ट्रॅकवर...

यंदाही मुलींचीच बाजी

पुणे : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण...

कृषी विभागात किरण जाधव नावाचा नवीन आका

बीड : भाजप आमदार सुरेश धस यांनी कृषी विभागातील...

…म्हणून वाणीची एन्ट्री झाली

मुंबई : अजय देवगणचा नुकताच रेड २ रिलीज झाला....

Related Articles

EKMAT DIGITAL
Video thumbnail
Nanded|'नाना पटोले यांना गुरू मानतो'; पाद्यपूजनावर काँग्रेस कार्यकर्त्यांचे स्पष्टीकरण
06:36
Video thumbnail
Latur|लातूर LCB ची धडाकेबाज कारवाई; घरफोडी प्रकरणाचा मोठा खुलासा
01:06
Video thumbnail
Latur|वडवळमध्ये घाणीचं साम्राज्य; ग्रामस्थांचा संताप
01:39
Video thumbnail
Purna|५० वर्षांचा गौरवशाली प्रवास! पूर्ण्यात जवाहरलाल नेहरू इंग्लिश स्कूलचा सुवर्ण महोत्सव
01:48
Video thumbnail
Latur|हैदराबादपेक्षाही भव्य? लातुरात उभारला जाणार 'स्टॅच्यू ऑफ नॉलेज'
02:14
Video thumbnail
Latur|एकमत डिजिटलच्या बातमीचा परिणाम; लातूरची सिटी बस सेवा पुन्हा सुरू
03:24
Video thumbnail
Latur|साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे जयंतीनिमित्त विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप
02:14
Video thumbnail
Nanded|२०२६ मध्येही अशी अवस्था! गर्भवतीला खाटेवरून रुग्णालयात नेण्याची वेळ
02:13
Video thumbnail
Nanded|हद्दपार आरोपीची किनवटच्या रस्त्यांवर पोलिसांनी काढली धिंड!
00:28
Video thumbnail
Latur|धावत्या ई-बाईकला अचानक आग; दोन स्फोटांनी उडाली खळबळ!
00:31
Video thumbnail
Nanded|MPSC मध्ये प्रथम आलेला अधिकारी लाचप्रकरणात अटकेत; संपत्तीची चौकशी सुरू
02:19
Video thumbnail
Latur|लातूरची सिटी बस सेवा ५ दिवसांपासून बंद; प्रवाश्यांचे हाल
03:29
Video thumbnail
Latur|लातुरात अण्णाभाऊ साठे जयंती सामाजिक उपक्रमांनी गाजली
01:38
Video thumbnail
Latur|'आरक्षणावरून समाजात तेढ नको' – माजी मंत्री दिलीपरावजी देशमुख यांचे आवाहन
05:23
Video thumbnail
Nanded|संतप्त नागरिकांनी थेट नगरपंचायत कार्यालयातच टाकला कचरा!
01:59

Latest news