मोठी बातमी: राज्यातील २६५ तालुक्यांमध्ये अखेर दुष्काळ जाहीर; फडणवीस सरकारचा शेतकऱ्यांना दिलासादायक निर्णय

मुंबई (विशेष प्रतिनिधी): राज्यात पावसाने दिलेल्या मोठ्या ओढीमुळे बळीराजा संकटात सापडला असताना राज्य सरकारने एक महत्त्वपूर्ण आणि मोठा निर्णय घेतला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्यातील ३५८ पैकी तब्बल २६५ तालुक्यांमध्ये दुष्काळ अधिकृतपणे जाहीर केला आहे. या निर्णयामुळे महाराष्ट्राचा सुमारे ७५ टक्के भाग दुष्काळछायेत असल्याचे स्पष्ट झाले असून, बाधित शेतकऱ्यांना तातडीने मोठा दिलासा मिळणार आहे.

पावसा अभावी पिकांची झालेली हानी आणि पाण्याची निर्माण झालेली तीव्र टंचाई या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नुकतीच विदर्भ आणि मराठवाड्याच्या दुष्काळग्रस्त भागांची प्रत्यक्ष पाहणी केली होती. त्यानंतर परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन ‘ट्रिगर-१’ च्या निकषानुसार हे २६५ तालुके दुष्काळी म्हणून घोषित करण्यात आले आहेत.

शेतकऱ्यांसाठी जाहीर करण्यात आलेल्या महत्त्वपूर्ण उपाययोजना
दुष्काळ घोषणेसोबतच राज्य सरकारने बाधित भागांतील शेतकरी, शेतमजूर आणि नागरिकांना आर्थिक व पायाभूत आधारासाठी अनेक सवलती व उपाययोजनांची घोषणा केली आहे. शेतीक्षेत्राला दिलासा देण्यासाठी जमीन महसुलात पूर्ण सूट देण्यात येणार असून शेतीशी निगडित सर्व प्रकारच्या कर्जाच्या वसुलीला तात्काळ स्थगिती देण्यात आली आहे. याशिवाय विद्यमान पीक कर्जांचे पुनर्गठन देखील केले जाईल. वीजबिलाच्या बाबतीत, ७.५ हॉर्सपॉवर क्षमतेच्या कृषीपंपांचे वीजबिल आधीच माफ करण्यात आले होते, आता त्यापेक्षा जास्त क्षमतेच्या वीजपंपांच्या चालू वीजबिलातही सवलत दिली जाणार आहे. तसेच टंचाईग्रस्त गावांमधील शेतीपंपांची वीजजोडणी थकबाकीअभावी खंडित न करण्याचे स्पष्ट निर्देश देण्यात आले आहेत.

ग्रामीण भागातील सामाजिक व शैक्षणिक परिस्थितीचा विचार करून दुष्काळग्रस्त भागातील शालेय व महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना परीक्षा शुल्कात पूर्ण माफी देण्यात आली आहे. स्थानिक पातळीवर रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्यासाठी महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेतील नियमांमध्ये शिथिलता आणून जास्तीत जास्त कामे सुरू केली जातील. शेतीवर अवलंबून असलेल्या शेतकरी आणि शेतमजुरांना धान्य पुरवठा करण्याची घोषणाही करण्यात आली आहे. यासोबतच, पाणीटंचाईवर मात करण्यासाठी आवश्यक असलेल्या सर्व ठिकाणी पिण्याच्या पाण्याचे टँकर्स पुरवले जातील, जनावरांसाठी चारा व पाण्याच्या छावण्यांची व्यवस्था केली जाईल आणि जलसंधारणाची कामे मोठ्या प्रमाणावर हाती घेतली जातील.

पंचनाम्यांचे तातडीने आदेश
दुष्काळाच्या प्रत्यक्ष मदतीची अंमलबजावणी वेगाने व्हावी यासाठी मुख्यमंत्र्यांनी राज्यातील सर्व जिल्हाधिकाऱ्यांना पिकांच्या नुकसानीचे पंचनामे तात्काळ पूर्ण करण्याचे आदेश दिले आहेत. पारदर्शकता राहावी यासाठी पिकांची स्थिती दर्शवणारी छायाचित्रे आणि जीपीएस लोकेशन डेटा संकलित करण्याचे निर्देशही प्रशासनाला देण्यात आले आहेत.

“पावसाअभावी अडचणीत आलेल्या बळीराजाच्या पाठीशी राज्य सरकार पूर्ण ताकदीने उभे आहे. दुष्काळग्रस्तांना सर्व शक्य ती मदत वेळेत पोहोचवणे हे आमचे प्राधान्य आहे.”

राज्य सरकारच्या या निर्णयामुळे आर्थिक संकटात सापडलेल्या राज्यातील लाखो शेतकरी कुटुंबांना तात्पुरता मोठा आधार मिळाला आहे.

हे आहेत दुष्काळग्रस्त तालुके
कोकण
रायगड : १ तालुका
रत्नागिरी : ३ तालुके
सिंधुदुर्ग : ८ तालुके

उत्तर महाराष्ट्र

नाशिक : १० तालुके
धुळे : ०४ तालुके
जळगाव :१५ तालुके
नंदुरबार :०६ तालुके
अहिल्यानगर : १४ तालुके

पश्चिम महाराष्ट्र

पुणे : ८ तालुके
सोलापूर :११ तालुके
सांगली :०४ तालुके
सातारा :०६ तालुके
कोल्हापूर :०६ तालुके

मराठवाडा

छत्रपती संभाजीनगर :०९ तालुके
जालना :०८ तालुके
बीड : ११ तालुके
लातूर : १० तालुके
धाराशिव : ०८ तालुके
नांदेड : १४ तालुके
परभणी :०९ तालुके
हिंगोली :०५ तालुके

विदर्भ
बुलढाणा १३ तालुके
अमरावती १४ तालुके
अकोला ७ तालुके
वाशिम झ्र ६ तालुके
यवतमाळ १६ तालुके
वर्धा ७ तालुके
नागपूर १४तालुके
भंडारा ३ तालुके
गोंदिया ०१ तालुके
चंद्रपूर १२ तालुके
गडचिरोली ०२ तालुके

(ठाणे आणि पालघर जिल्ह्यातील एकही तालुक्यात दुष्काळ नाही)

Hot this week

नांदेडात एकाच दिवशी दोन अधिकारी निलंबित

नांदेड : महापलिकने हाती घेतलेल्या १०० दिवस विशेष कार्यक्रमात...

कोलकात्याकडून दिल्ली पराभूत

दिल्ली : कोलकाता नाईट रायडर्स टीम अखेर विजयी ट्रॅकवर...

यंदाही मुलींचीच बाजी

पुणे : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण...

कृषी विभागात किरण जाधव नावाचा नवीन आका

बीड : भाजप आमदार सुरेश धस यांनी कृषी विभागातील...

…म्हणून वाणीची एन्ट्री झाली

मुंबई : अजय देवगणचा नुकताच रेड २ रिलीज झाला....

Related Articles

EKMAT DIGITAL
Video thumbnail
Nana Patekar Speech|अभिनेते नाना पाटेकर आपल्या भाषणात भावूक का झाले? काय म्हणाले
24:31
Video thumbnail
Nana Patekar|ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांचं निधन; वयाच्या ७५व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
01:31
Video thumbnail
Nanded|निवडणूक आयुक्तांच्या राजीनाम्यासह SIRविरोधात इंडिया आघाडीचा नांदेडमध्ये मोर्चा
03:34
Video thumbnail
लातूरच्या कन्हेरी चौकातून अपहरण करत बर्दापूर येथील खडी केंद्रावर मारहाण; ३२वर्षीय तरुणाचा मृत्यू
02:56
Video thumbnail
Nanded|डॉक्टर होण्याचं स्वप्न, हातात विळा! MBBS विद्यार्थी आईसोबत सोयाबीन काढतोय
03:40
Video thumbnail
Nanded|नांदेडमध्ये पाणी चोरीविरोधात धडक कारवाई; ५ दिवसांत ४०० मोटारींची कनेक्शन कट
02:36
Video thumbnail
Latur|आदर्शवर बुलडोझर फिरणार? फरार बशीर शेखच्या अडचणी वाढल्या!
03:39
Video thumbnail
Latur|ठाकरे चौकातील कोयता हल्ल्यानंतर पोलिस ॲक्शन मोडवर; शहरात सरप्राईज नाकेबंदी
03:41
Video thumbnail
शिक्षक द्या, नाहीतर कार्यालयातच शाळा! शिरूर अनंतपाळमध्ये शाळा व्यवस्थापन समितीचे अनोखे आंदोलन
02:56
Video thumbnail
Latur|दुष्काळात लाखो लिटर पाणी आगीवर नियंत्रणासाठी खर्च; आग लागू नये म्हणून कोणती काळजी घ्यावी?
06:18
Video thumbnail
Latur|एकमत डिजिटलच्या बातमीचा दणका! अखेर चायनीज सेंटर दुकानदाराला न्याय
05:27
Video thumbnail
Latur|१३ तासांच्या झुंजीनंतर कचरा डेपोची आग नियंत्रणात; ३८ तासांनंतरही धुराचे लोट कायम!
04:02
Video thumbnail
ऐन दुष्काळात शेतकऱ्यावर चोरट्यांचा दरोडा; पाटोदा बुद्रुकमधून ३ दुभत्या म्हशी पळवल्या
02:22
Video thumbnail
mpsc विद्यार्थ्यांच्या आंदोलनातून आमदार रोहित पवार लाईव्ह
18:54
Video thumbnail
पंचनाम्याचा फार्स थांबवा, थेट बँक खात्यात मदत टाका; शिरूर अनंतपाळमधील शेतकऱ्यांची आक्रमक मागणी!
02:03

Latest news