इंफाळ : मणिपूरमध्ये अजूनही परिस्थिती सुधारलेली नाही. अधून-मधून हिंसाचाराच्या घटना घडत आहेत. राज्याची राजधानी इंफाळला जोडणाऱ्या दोन राष्ट्रीय महामार्गांच्या आर्थिक नाकेबंदीमुळे लोकांना जीवनावश्यक वस्तूंच्या पुरवठ्यात अडथळे येत होते. मालाने भरलेली वाहने मध्येच अडकून पडत होती. अशात मणिपूरमधून एक दिलासादायक बातमी समोर आली आहे. कुकी समुदायाने सोमवारी (२७ नोव्हेंबर) आर्थिक नाकेबंदीचा निर्णय स्थगित करण्याची घोषणा केली आहे.
आर्थिक नाकेबंदी सुरू झाल्यामुळे इंफाळला जाणाऱ्या मालवाहू वाहनांना घाटीत पोहोचू दिले जात नव्हते. नाकाबंदीमागील मुख्य कारण म्हणजे घाटी परिसरातील मैतेई लोकांना जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा होऊ शकत नव्हता. राष्ट्रीय महामार्ग-२ वरून लष्कराच्या ट्रकला ये-जा करण्यापासून रोखण्याचेही प्रयत्न सुरू होते. राजधानी इंफाळमध्ये मेईतेईचे वर्चस्व आहे. मैतेई नंतर मणिपूरमधील दुसरा प्रभावशाली गट कुकी आहे. ज्याने आता खोऱ्याच्या प्रदेशाला जोडणाऱ्या या दोन राष्ट्रीय महामार्गांची १२ दिवसांची ‘आर्थिक नाकेबंदी’ स्थगित केली आहे. त्यामुळे खोऱ्यात पुरवठा होणाऱ्या मालाची वाहतूक सुलभ होण्याची शक्यता आहे.
कांगपोकमी हा मणिपूरमधील कुकी बहुल जिल्हा असून येथे कायदा आणि सुव्यवस्था सुधारण्यासाठी प्रशासनाची उदासीन वृत्ती दिसत आहे. त्यामुळे संतप्त झालेल्या आदिवासी एकता समितीने १५ नोव्हेंबर रोजी आर्थिक नाकेबंदी जाहीर केली होती. वृत्तानुसार, नाकाबंदी सुरू झाल्यामुळे, नागालँड राज्याच्या सीमेवर असलेल्या दिमापूर आणि सिलचर (आसाम) यांना जोडणाऱ्या या मार्गांवरील वाहतुकीवर परिणाम झाल्यामुळे मणिपूरची राजधानी आणि राज्याच्या इतर भागांमध्ये मालाचा पुरवठा ठप्प झाला होता.
या मुद्द्यावर बरीच चर्चा
एका निवेदनात सांगण्यात आले आहे की, परिसरातील सहकारी आदिवासींच्या अडचणी समजून घेऊन आर्थिक नाकेबंदी तात्पुरती स्थगित करण्याचा निर्णय घेतला आहे. हा निर्णय घेण्यापूर्वी या मुद्द्यावर बरीच चर्चा झाली होती. समितीने कुकी-जो भागात कायदा व सुव्यवस्थेच्या निवडक अंमलबजावणीसाठी आर्थिक नाकेबंदी जाहीर केली होती.