27.1 C
Latur
Sunday, January 19, 2025
Homeराष्ट्रीयआयएसआयएसच्या मोठ्या दहशतवादी प्लानचा पर्दाफाश

आयएसआयएसच्या मोठ्या दहशतवादी प्लानचा पर्दाफाश

नवी दिल्ली : आयएसआयएसच्या मोठ्या दहशतवादी प्लानचा पर्दाफाश झाला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, देशातील दोन मोठ्या शहरांमध्ये आतापर्यंतचे सर्वात मोठे दहशतवादी बॉम्बस्फोट घडवण्याचा कट रचला जात होता. अटक करण्यात आलेल्या इसिस दहशतवाद्याच्या कबुलीजबाबातून हे उघड झाले आहे. अहमदाबाद आणि गांधी नगरमध्ये मोठे स्फोट घडवून आणण्याची आयएसआयएसची योजना होती. मुंबईतील नरिमन हाऊस आणि गेटवे ऑफ इंडियावरही मोठे दहशतवादी हल्ले घडवण्याची आयएसआयएसची योजना होती.

याशिवाय भारताचे काही महत्त्वाचे लष्करी तळही इसिसच्या लक्ष्यावर होते. भारताच्या महत्त्वाच्या लष्करी तळांची काढलेली छायाचित्रे पाकिस्तान आणि सीरियाला पाठवण्यात आली होती. अलीगड मुस्लिम विद्यापीठातील काही संशयित विद्यार्थ्यांची भूमिका एजन्सींच्या रडारवर आली. दहशतवादी हल्ल्यांच्या नियोजनासाठी इसिसने पुण्याला दहशतवादी केंद्र बनवले होते. हा खुलासा करणाऱ्या आयएसआयएसचा दहशदवादी हा ३१ वर्षांचा असून त्याचे नाव शाहनवाज आहे.

शाहनवाजने चौकशीदरम्यान सांगितले की, आपली आर्थिक स्थिती सुधारण्यासाठी त्याने हजारीबागमध्ये सुमारे ७ ते ८ गुन्हेगारी घटना घडवून आणल्या होत्या. तसेच अल कायदाचा सर्वोच्च दहशतवादी जो अमेरिकन सैन्याच्या हल्ल्यात मारला गेला तो शाहनवाजचा गुरू होता. त्याच्या प्रभावाखाली त्याला दहशतवादी बनण्याचे वेड लागले आणि नंतर तो ऑनलाइन साइट्सवरील कट्टरपंथी मुस्लिमांच्या गटांमध्ये आणि आयएसआयएसच्या हस्तकांमध्ये सामील झाला. हवालाद्वारे पुण्यातील सर्व दहशतवाद्यांना वेळोवेळी पैसे दिले जात होते, ज्याचा ते बॉम्ब बनवण्यासाठी आणि प्रशिक्षण शिबिरे आयोजित करण्यासाठी वापरत होते.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR