23.5 C
Latur
Sunday, October 13, 2024
Homeमहाराष्ट्रपुणे इसिस मॉड्यूलमधील दहशतवादी उच्च शिक्षित

पुणे इसिस मॉड्यूलमधील दहशतवादी उच्च शिक्षित

- ३१ लाख रुपयांचे होते पॅकेज - एनआयएचा धक्कादायक खुलासा

पुण : पुणे शहरात इसिस मॉड्युल प्रकरणात आरोपपत्र दाखल करण्यात आले आहे. राष्ट्रीय तपास संस्थेने (एनआयए) हे आरोपपत्र दाखल केले आहे. त्यात इसिस मॉड्यूलचा धक्कादायक खुलासा करण्यात आला आहे. पुणे इसिस मॉड्यूल प्रकरणातील दहशतवादी उच्चशिक्षित आहेत. त्यांना लाखो रुपयांचे पॅकेज होते. या प्रकरणातील आरोपी जुल्फीकार अली हा एका मोठ्या आयटी कंपनीत कामाला होता. त्याला वार्षिक ३१ लाख रुपये पगार होता, अशी माहिती आरोपपत्रातून एनआयएने दिली आहे.

तसेच उर्वरित आरोपींपैकी शाहनवाज शैफुजामा हा मायनिंग इंजिनीअर होता. त्याला स्फोटकांचे चांगले ज्ञान होते. त्याचा वापर करून त्याने बॉम्बची निर्मिती केली, असे एनआयएने म्हटले आहे.
आरोपी कादीर पठाण पुणे येथे ग्राफिक डिझायनर म्हणून काम करत होता. त्याने सोबत असणा-या इम्रान खान आणि युनूस साकी यांनाही ग्राफिक्स शिकवले होते. आरोपी आपली ओळख लपून राहावी म्हणून ग्राफिकची कामे करून पैसे कमवत होते, असे एनआयएने म्हटले आहे. आरोपींनी आयईडी स्फोटक बनवण्यासाठी काही गोष्टी खरेदी केल्या होत्या. ज्यामध्ये काही केमिकल्स होती. या केमिकल्ससाठी ते कोडवर्डचा वापर करत होते.

काय आहेत कोडवर्डस्
सल्फरिक अ‍ॅसिडसाठी व्हिनेगार हा कोडवर्ड दहशतवाद्यांनी ठेवला होता. असेटॉन केमिकल्ससाठी रोजवॉटर हा कोडवर्ड ठेवला होता. तर हायड्रोजन पॅरॉक्साईडसाठी शरबत हा कोडवर्ड होता. या प्रकरणातील आरोपींना मोहम्मद नावाचा एक हँडलर ऑपरेट करत होता. शिवाय आयईडी बॉम्ब बनवण्याचे काम आरोपींकडून युद्धपातळीवर सुरू होते, असे एनआयएने आरोपपत्रात म्हटले आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR