25.8 C
Latur
Friday, June 21, 2024
Homeमहाराष्ट्रमहादेव बेटिंगप्रकरणी भाजप नेता अटकेत

महादेव बेटिंगप्रकरणी भाजप नेता अटकेत

वाशिम : प्रतिनिधी
देशभरात चर्चेत असलेल्या महादेव बेटिंग अ‍ॅप प्रकरणात सेलिब्रिटींसह बड्या हस्तींची नावे समोर आली आहेत. त्यामुळे तपास यंत्रणांकडून बारकाईने तपास होत आहे. यातूनच महादेव बेटिंग अ‍ॅप किती खोलपर्यंत पोहोचले होते, याचा अंदाज येईल. कारण राज्यात नव्हे तर देश-विदेशात पोहोचलेले महादेव बेटिंग अ‍ॅपचे कनेक्शन आता थेट विदर्भातील वाशिम जिल्ह्यापर्यंत पोहोचले आहे. महादेव या अनधिकृत बेटिंग अ‍ॅपवर पुणे ग्रामीण पोलिसांच्या स्थानिक गुन्हे शाखेने काही दिवसांपूर्वी नारायणगाव येथे मोठी कारवाई केली होती.

आता या प्रकरणी भाजप ओबीसी सेलच्या पदाधिका-यास अटक करण्यात आली. या प्रकरणी पोलिसांनी नारायणगाव येथील तीन मजली इमारतीत धाड टाकून ६० लाखांचा मुद्देमाल जप्त केला होता तर जवळपास ९० जणांवर गुन्हे दाखल झाले आहेत. या प्रकरणात वाशिम भाजप ओबीसी मोर्चाचा पदाधिकारी विराज ढोबळेच्या मागावर पोलिस होते, अखेर पोलिसांनी विराज ढोबळे यास अटक केली. भाजप ओबीसी युवा मोर्चा पदाधिकारी विराज ढोबळे पुण्यात राहात असे. वाशिम पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR