22.3 C
Latur
Friday, August 1, 2025
Homeमहाराष्ट्रमराठी माणसाची पहलगाममधील दहशतवाद्यांशी तुलना करणारा भाजप महाराष्ट्राचा मारेकरी

मराठी माणसाची पहलगाममधील दहशतवाद्यांशी तुलना करणारा भाजप महाराष्ट्राचा मारेकरी

मूळ भाजपाला यांनी मारून टाकलंय

मुंबई : प्रतिनिधी
मराठी माणूस न्याय हक्कांसाठी आंदोलन करत असताना त्याची तुलना जे कुणी भाजपवाले पहलगामच्या दहशतवाद्यांशी करत असतील, तर ते मराठीचे मारेकरी आहेत. तुम्ही हिंदूंना वाचवू शकत नाही. वर मराठी माणसावर अन्याय करणा-यांची बाजू घेता. असले कर्मदरिद्री लोक महाराष्ट्रात राज्यकर्ते आहेत, हे महाराष्ट्राचं दुर्दैव आहे अशी जळजळीत टीका शिवसेना ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आज केली.

शनिवारी झालेल्या विजयी मेळाव्यात रुदालीचे भाषण झाले’ अशी बोचरी प्रतिक्रिया मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केली होती. या टीकेला उद्धव ठाकरेंनी आज विधानभवनात प्रसारमाध्यमांशी बोलताना उत्तर दिले. मी त्यांची मानसिकता समजू शकतो. कारण मूळ भाजप मेलेला आहे. त्याचा खून या लोकांनी केला आहे. रुदाली हाही हिंदी शब्द आहे. त्याचा अर्थ उरबडवे. दुख: व्यक्त करण्यासाठी, उर बडवायलाही यांच्याकडे मूळ माणसं नाहीत. त्यांना ती माणसंही इतर पक्षातून घ्यावी लागत आहेत. मी फडणवीसांची प्रतिक्रिया समजू शकतो. पण मराठी माणसाचे आनंदाचे क्षण ज्यांना रुदाली वाटत असतील, ती अतिशय विकृत आणि हिणकस वृत्तीची माणसं आहेत अशी टीका उद्धव ठाकरे यांनी केली.

पहलगामचे दहशतवादी कुठे गेले ?
भाजपा नेते आशिष शेलार यांनी गुजराती व्यापा-याला मारहाण करणा-यांची तुलना पहलगाममधील दहशतवाद्यांशी केली होती. याबाबत विचारता उद्धव ठाकरे यांनी हे महाराष्ट्राचे आणि मराठीचे मारेकरी आहेत. जो मराठी माणूस न्याय्य हक्कांसाठी आंदोलन करतो, त्याची तुलना जे कुणी भाजपावाले पहलगामच्या दहशतवाद्यांशी करत असतील, तर ते मराठीचे मारेकरी आहेत. मुळात पहलगामचे दहशतवादी कुठे गेले, भाजपात गेले का? हे त्यांनी सांगावे. एकतर तुम्ही हिंदूंनाही वाचवू शकत नाही. वर मराठी माणसावर अन्याय करणा-यांची तुम्ही बाजू घेता. असे कर्मदरिद्री लोक महाराष्ट्रात राज्यकर्ते आहेत, हे महाराष्ट्राचे दुर्दैव आहे अशी टीका त्यांनी केली.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR