30.3 C
Latur
Tuesday, April 29, 2025
Homeमहाराष्ट्रविदर्भातून भाजपचा सुपडा साफ होणार

विदर्भातून भाजपचा सुपडा साफ होणार

विजय वडेट्टीवारांचा दावा

मुंबई : लोकसभा निवडणुकीच्या तिस-या टप्प्यातील मतदान येत्या ७ मे रोजी होणार आहे. अशात आज मोदीच आमचे स्टार प्रचारक असून विदर्भात भाजपचा सुपडा साफ होणार असा दावा काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी केला. विदर्भातील १० च्या १० जागा काँग्रेसचे उमेदवार जिंकणार असा विश्वास वडेट्टीवार यांनी पत्रकार परिषदेत बोलून दाखवला.

विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवारांनी मविआच्या विजयाबद्दल विश्वास व्यक्त केला. विदर्भातील १० च्या १० जागा जिंकणार असून नितीन गडकरीसुद्धा निवडणूक हरणार आहेत, असे सर्व्हेमधून स्पष्ट सांगतो, असे वडेट्टीवार म्हणाले. विदर्भानंतर मराठवाड्यातही तेच चित्र आहे. मराठवाड्यातील ८ जागांवर महाविकास आघाडी आणि इंडिया आघाडी जिंकणार आहे, असा दावा वडेट्टीवार यांनी केला आहे.

महाराष्ट्रात ही निवडणूक एकतर्फी होताना दिसत असल्याचेही ते यावेळी म्हणाले. लोकांचा जल्लोष आणि उत्साह जो पाहिला मिळतोय त्यानुसार राज्यात आम्ही किमान ३८ जागा जिंकणार, असा विश्वास वडेट्टीवारांनी व्यक्त केला आहे.
कोल्हापूरमध्ये चार चार दिवस मुख्यमंत्री एकनाथ शिंदे मुक्कामास आहेत. त्याचवेळी छत्रपती शाहू महाराजांच्या विचारांची महायुतीला घृणा का वाटते, असा गंभीर आरोपही वडेट्टीवारांनी केला. तो विचार संपण्याचा राग यांच्या डोक्यात आहे का? असा सवालही त्यांनी यावेळी केला.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR