23.6 C
Latur
Wednesday, June 18, 2025
Homeराष्ट्रीयभाजपला १५० जागाही मिळणार नाहीत

भाजपला १५० जागाही मिळणार नाहीत

रतलाम : काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी पुन्हा एकदा भाजपाने निवडणूक जिंकली तर ते संविधान बदलतील असे म्हटले आहे. मध्य प्रदेशातील रतलाम येथे निवडणूक रॅलीला संबोधित करताना राहुल गांधी म्हणाले की, भाजपा नेत्यांनी स्पष्टपणे सांगितले आहे, निवडणुकीत जिंकलो तर संविधान बदलू, त्यामुळेच त्यांनी ४०० जागांचा नारा दिला होता. भाजपा-एनडीएला १५० जागाही मिळणार नसल्याचा दावा राहुल यांनी केला.

ही निवडणूक देशाची लोकशाही आणि संविधान वाचवण्याची निवडणूक असल्याचे राहुल म्हणाले. एका बाजूला नरेंद्र मोदी आणि आरएसएस आहेत, जे संविधान नष्ट करू पाहत आहेत. दुसरीकडे, काँग्रेस पक्ष आणि इंडिया आघाडी आहे, जी संविधान वाचवण्यात मग्न आहे. भाजपच्या लोकांना संविधान रद्द करून गरीब, दलित, आदिवासी आणि मागासवर्गीयांचे आरक्षण हिसकावून घ्यायचे आहे, मात्र आम्ही आरक्षण कधीच संपू देणार नाही, आरक्षणावरील ५० टक्के मर्यादाही आम्ही हटवणार आहोत असे राहुल गांधी यांनी सांगितले आहे.

तुमचे सर्व अधिकार काढण्याचा कट
राहुल गांधी यांनी हातात संविधान घेऊन लोकांना सांगितले की पंतप्रधान मोदींना हे (संविधान) काढून टाकायचे आहे आणि त्यांना फक्त राज्य करायचे आहे. त्यांना तुमचे सर्व अधिकार काढून घ्यायचे आहेत. हे त्यांचे ध्येय आहे आणि आम्ही थांबवण्याचा प्रयत्न करत आहोत. आदिवासी, मागासवर्गीय आणि दलितांना जे काही अधिकार मिळाले ते याचे (संविधान) योगदान आहे.

हवे तितके आरक्षण देऊ
भाजपाच्या नेत्यांनी स्पष्टपणे सांगितले आहे की, सत्तेत आल्यास ते हे बाजूला ठेवतील. त्यामुळेच त्यांनी ४०० जागांचा नारा दिला आहे. त्यांना १५० जागाही मिळणार नाहीत. त्यांचे नेते सांगत आहेत. ते आरक्षण काढून घेतील, आम्ही दलित, मागासवर्गीय आणि गरिबांना जितके आरक्षण हवंय ते देऊ असे राहुल गांधी यांनी म्हटले आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR