पूर्णा : शहरातील भारतीय जनता पार्टीचे धडाडीचे कार्यकर्ते माऊली बालासाहेब कदम यांची दि.१९ डिसेंबर रोजी भारतीय जनता पार्टी युवा मोर्चाच्या पूर्णा शहराध्यक्षपदी निवड करण्यात आली. पक्षाच्या बैठकीमध्ये नवनियुक्त जिल्हा नियोजन समिती परभणीचे सदस्य अनंतराव पारवे, शहराध्यक्ष प्रशांत कापसे यांच्या हस्ते नियुक्ती पत्र देऊन त्यांचा सत्कार करण्यात आला. याप्रसंगी बळीराम कदम, लक्ष्मीकांत कदम, आ. गुट्टे काका मित्र मंडळाचे तालुका अध्यक्ष गणेशराव कदम, दाजीबा भोसले विलास कदम, नंदकुमार डाखोरे, बालाजी कदम, विश्वनाथ होळकर, गोविंद ठाकूर, कपिल कदम, संजय अंभोरे आदींनी त्यांचे अभिनंदन केले.