16.2 C
Latur
Sunday, November 24, 2024
Homeमहाराष्ट्रभाजपचे ४० स्टार प्रचारक मैदानात

भाजपचे ४० स्टार प्रचारक मैदानात

पंतप्रधान मोदींसह गडकरी, फडणवीसांवर धुरा

नागपूर : प्रतिनिधी
महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीत राज्यातील २८८ जागांसाठी भाजपचे दिग्गज नेते प्रचारासाठी मैदानात उतरणार आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह ७ मुख्यमंत्री, एक डझनहून अधिक आजी-माजी केंद्रीय मंत्री, संघटनेतील प्रमुख नेते अशी ४० स्टार प्रचारकांची यादी पक्षाने जाहीर केली.

महाराष्ट्रात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या १२ ते १३ सभा होण्याचा अंदाज आहे. विदर्भात गोंदिया आणि अकोला येथे जाहीर सभा करण्याचे नियोजन पक्षाने केले आहे. स्टार प्रचारकांमध्ये भाजप राष्ट्रीय अध्यक्ष जगतप्रकाश नड्डा, संरक्षण मंत्री राजनाथसिंह, गृहमंत्री अमित शहा, केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी, उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ, गोवाचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत, गुजरातचे मुख्यमंत्री भूपेंद्रभाई पटेल, छत्तीसगडचे मुख्यमंत्री विष्णूदेव साय, मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री मोहन यादव, राजस्थानचे मुख्यमंत्री भजनलाल शर्मा, हरियाणाचे मुख्यमंत्री नायबसिंह सैनी, आसामचे मुख्यमंत्री हेमंता बिस्वा सर्मा, केंद्रीय कृषी मंत्री शिवराजसिंह चौहान, संघटन सहसचिव शिवप्रकाश, केंद्रीय वन व पर्यावरण मंत्री भूपेंद्र यादव, केंद्रीय माहिती व प्रसारण मंत्री अश्विनी वैष्णव, केंद्रीय रेल्वे व वाणिज्य मंत्री पीयूष गोयल, केंद्रीय संचार मंत्री ज्योतिरादित्य शिंदे, केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ, माजी केंद्रीय मंत्री नारायण राणे तसेच विदर्भातून वन मंत्री सुधार मुनगंटीवार, माजी खासदार नवनीत राणा, माजी मंत्री डॉ. संजय कुटे स्टार प्रचारक आहेत.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR