22.8 C
Latur
Thursday, February 22, 2024
Homeमुख्य बातम्यामध्यप्रदेशात फटाक्यांच्या कारखान्यात स्फोट; ११ जणांचा मृत्यू, १०० हून अधिक जखमी

मध्यप्रदेशात फटाक्यांच्या कारखान्यात स्फोट; ११ जणांचा मृत्यू, १०० हून अधिक जखमी

परिसरातील १०० घरे आगीच्या भक्ष्यस्थानी, रस्त्याच्या कडेला पडले मृतदेह

भोपाळ : हरदा येथील अवैध फटाका कारखान्यात स्फोट झाला. त्यामुळे आजूबाजूच्या १०० हून अधिक घरांना आग लागली. यामध्ये ११ जणांचा मृत्यू झाला. तर १०० हून अधिक लोक जखमी झाले आहेत. कारखान्याच्या आजूबाजूला रस्त्यावर काही मृतदेह पडले आहेत. २५ हून अधिक जखमींना हरदा जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. प्रशासनाने १०० हून अधिक घरे रिकामी केली आहेत. स्फोटामुळे वाहनांसह अनेक पादचारी दूर फेकले गेले. कारखान्यात अधूनमधून स्फोट होत असल्याचे सांगितले जात आहे.

CM Dr. Mohan Yadav called emergency cabinet meeting.

मगरधा रोडवरील बैरागढ गावात कारखाना आहे. मंगळवारी सकाळी ११ वाजण्याच्या सुमारास कारखान्यात एवढा भीषण स्फोट झाला की संपूर्ण शहर हादरले. आगीने उग्र रूप धारण केले. त्यामुळे परिसरात गोंधळाचे वातावरण आहे. कारखान्यातून उठणा-या आगीच्या ज्वाळा आणि धुराचे लोट दूरवरून दिसत होते. माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी रवाना झाल्या आहेत. आगीचे कारण सध्या समजू शकलेले नाही. हरदा आणि आसपासच्या जिल्ह्यातून सुमारे ११४ रुग्णवाहिका रवाना करण्यात आल्या आहेत.

मंत्रालयात तातडीची बैठक
मुख्यमंत्री डॉ. मोहन यादव यांनी भोपाळ, इंदूर येथील वैद्यकीय महाविद्यालय आणि एम्स भोपाळमधील बर्न युनिटला जखमींवर उपचारासाठी आवश्यक तयारी करण्याचे निर्देश दिले आहेत. जखमींवर उत्तम उपचार हे आमचे पहिले प्राधान्य असल्याचे मुख्यमंत्र्यांनी म्हटले आहे. तसेच मुख्यमंत्री डॉ. मोहन यादव यांनी मंत्रालयात वरिष्ठ अधिका-यांची तातडीची बैठक घेऊन घटनेच्या स्थितीबाबत माहिती घेतली व आवश्यक निर्देश दिले.

घरांमध्ये ठेवण्यात आले बारूद
कारखान्याच्या आजूबाजूच्या घरांमध्ये बेकायदेशीरपणे बारूद ठेवल्याचे सांगण्यात आले. यामुळे अनेक घरे पूर्णपणे उध्वस्त झाली. येथून जाणा-या अनेक पादचा-यांना याचा फटका बसला. रस्त्याच्या कडेला अनेक मृतदेह पडले आहेत.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR