30.6 C
Latur
Saturday, March 2, 2024
Homeक्रीडाबँझबॉल म्हणजे काय?

बँझबॉल म्हणजे काय?

मैदानाबाहेरून
गेल्या काही महिन्यांपासून इंग्लंडच्या क्रिकेट वर्तुळात एक शब्द खूप चर्चेत आहे तो म्हणजे बँझबॉल. या एका शब्दाने इंग्लंडचे कसोटी क्रिकेट बदलून टाकले आहे. आता मोठे टार्गेटही इंग्लंडकडून सहज गाठले जात आहे. याचे अगदी ताजे उदाहरण भारताविरुद्धच्या पहिल्या कसोटी सामन्यात पाहायला मिळाले. जिथे गतवर्षी अ‍ॅजबॅस्टन कसोटीत इंग्लंडने आश्चर्यकारकरीत्या विशाल लक्ष्याचा पाठलाग करत सामना जिंकला. हे बँझबॉल प्रकरण नेमके काय आहे ते जाणून घेऊ या.

इंग्लंडच्या कसोटी संघाला काही दिवसांपूर्वीच नवा प्रशिक्षक मिळाला. न्यूझिलंडचा माजी कर्णधार ब्रेंडन मॅक्युलमकडे ती जबाबदारी सोपवण्यात आली. मॅक्युलमचे टोपणनाव बँझ आहे. तर तो जी रणनीती आखतो त्या रणनीतीचे नाव बँझबॉल आहे. या रणनीतीनेच इंग्लंडचे कसोटी क्रिकेट खेळण्याचे कल्चरच बदलून टाकले आहे. इंग्लंडने त्यांच्या कसोटी इतिहासात चौथ्या डावात कधीच एवढ्या लक्ष्याचा यशस्वी पाठलाग केला नव्हता. तसेच, भारताने ३५० पेक्षा जास्त धावांचे लक्ष्य देऊन एकही सामना गमावला नव्हता.

ब्रेंडन मॅक्युलम जेव्हा क्रिकेट खेळत होता, तेव्हा त्याची स्टाईल अशीच होती. तीच स्टाईल आता त्याच्या कोचिंगमधून दिसून येत आहे. कोणतेही फॉरमॅट असो, येताच आक्रमक सुरुवात करणे, कसोटीतही पुढे येऊन षटकार मारणे, ही त्याची स्टाईल होती. न्यूझिलंडचा कर्णधार बनल्यानंतर ब्रेंडन मॅक्युलमने त्या संघाचाही विचार बदलला होता, यानंतर न्यूझिलंडने अनेक सामने जिंकले. तसेच, न्यूझिलंडने सलग दोनवेळा विश्वचषकाच्या अंतिम फेरीत धडक मारली. वनडेमध्ये पहिल्या पंधरा षटकांत शंभरी गाठण्याचे ध्येय तत्कालीन क्रिकेटपटंूनी ठेवले होते. तुम्हाला आठवत असेल तर सनथ जयसूर्या व रोमेश कालू वितरणा हे श्रीलंकेसाठी सलामीला उतरायचे. त्यांनी सुद्धा अशीच सुरुवात १९९६ च्या वर्ल्डकपमध्ये केली होती. त्याचाच विचार करताना २०२३ च्या विश्वचषकमध्ये कर्णधार रोहित शर्मा याने हीच कामगिरी बजावण्याचा प्रयत्न प्रत्येक सामन्यात केला होता. शतक झाले नाही तरी चालेल पण भारताच्या खात्यात धावा जमल्या पाहिजेत हे ध्येय होते.

ब्रेंडन मॅक्क्युलमला इंग्लंडचा कोच बनवल्यानंतर प्रत्येकालाच विशेष अशा बदलाची अपेक्षा होती. आता तो बदल जाणवायला सुरुवात झाली आहे. मॅक्युलमने पदभार स्वीकारताच इंग्लंडला नवा कसोटी कर्णधार मिळाला, तो म्हणजे बेन स्टोक्स. कर्णधार आणि प्रशिक्षक दोघेही आक्रमक शैलीचे आहेत. याचा परिणाम संपूर्ण संघावर दिसून येत आहे. इंग्लंडने त्यांच्या कसोटी इतिहासात चौथ्या डावात कधीच एवढ्या लक्ष्याचा यशस्वी पाठलाग केला नव्हता. तसेच, भारताने ३५० पेक्षा जास्त धावांचे लक्ष्य देऊन एकही सामना गमावला नव्हता.

विशाखापट्टणम कसोटीत इंग्लंडला जेव्हा ३९६ धावांचे लक्ष्य मिळाले, तेव्हा सामन्याचे दोन दिवस बाकी होते. म्हणजेच इंग्लंडला आव्हान गाठण्यासाठी १८० षटके मिळाली होती. तसेच, भारताला इंग्लंडला ऑलआऊट करण्यासाठी तेवढाच काळ मिळाला होता. पण या कसोटीत बेस्ट यशस्वी झाली नाही कारण जसप्रीत सिंग बुमराची भेदक गोलंदाजी.
डॉ. राजेंद्र भस्मे , कोल्हापूर

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR