24 C
Latur
Sunday, January 19, 2025
Homeराष्ट्रीयबिहारमध्ये बोट उलटली; ३ महिलांचा मृत्यू

बिहारमध्ये बोट उलटली; ३ महिलांचा मृत्यू

पाटणा : बिहारमध्ये बुधवारी मोठी दुर्घटना घडली आहे. राज्यातील छपरा भागातील मतियारजवळ एक बोट उलटली. बोटीतील १२ जण बेपत्ता झाले आहेत. बेपत्ता लोकांच्या शोधासाठी बचावकार्य सुरू करण्यात आले आहे. या अपघातात तीन महिलांचा मृत्यू झाला आहे. आतापर्यंत सहा जणांना नदीतून बाहेर काढण्यात आले आहे. त्यातील तीन महिलांचा मृत्यू झाला. इतर तिघांना स्थानिक रुग्णालयात पाठवण्यात आले आहे. १२ जण अद्याप बेपत्ता आहेत.

रात्रीची वेळ असल्याने बचावकार्यात अनेक अडचणी येत आहेत. घटनेची माहिती मिळताच वरिष्ठ अधिकारी घटनास्थळी दाखल झाले आहेत. बोट उलटण्याचे कारण अद्याप समोर आलेले नाही. सायंकाळी ही घटना घडली. ही माहिती पोलिस प्रशासनापर्यंत पोहोचताच जिल्हाधिकारी आणि पोलिस अधीक्षक घटनास्थळी रवाना झाले.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR