भिवंडी : शहरातील नारपोली परिसरात असलेल्या सोलंकी प्रोसेस मिल या कपड्यावर रंगकाम करणा-या डाईंग कारखान्यात रात्री उशिरा बॉयलरचा स्फोट होण्याची घटना घडली. या दुर्घटनेत दोन कामगार जखमी झाले आहेत.
घटनेची माहिती मिळताच अग्निशामक दलाच्या दोन गाड्या घटनास्थळी दाखल होत त्यांनी अवघ्या एक तासात बॉयलर स्फोटामुळे लागलेल्या आगीवर नियंत्रण मिळवले.
आगीचे कारण अजून स्पष्ट नसून भोईवाडा पोलिस या घटनेची चौकशी करीत आहेत. या बॉयलर स्फोटाचा व्हीडीओ शनिवारी सकाळपासून समाज माध्यमांवर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला आहे.