29 C
Latur
Saturday, March 2, 2024
Homeमनोरंजनसलमान खानच्या फार्म हाऊसमध्ये घुसण्याचा दोघांचा प्रयत्न

सलमान खानच्या फार्म हाऊसमध्ये घुसण्याचा दोघांचा प्रयत्न

मुंबई : अभिनेता सलमान खानचे पनवेलमधील फार्म हाऊस पुन्हा एकदा चर्चेत आलंय. यामध्ये दोन जणांनी जबरदस्ती घुसण्याचा प्रयत्न केलाय. याप्रकरणी पनवेल पोलिसांनी दोघांना ताब्यात घेतले आहे.

अजेश कुमार ओम प्रकाश गीला आणि गुरू सेवक सिंग तेजा सिंग सिख (दोघेही रा.पंजाब) अशी दोघांची नावे आहेत. काल रविवार (६ जानेवारी) रोजी दुपारी ४ वाजेच्या सुमारास दोन व्यक्ती कुणाचीही परवानगी न घेता सलमान खानच्या फार्म हाऊसच्या मेन गेटच्या डाव्या बाजूने कंपाउंडमधून फार्म हाऊसमध्ये घुसण्याचा प्रयत्न करत होते. यावेळी सुरक्षा रक्षकांचे लक्ष गेल्याने त्या दोघांनाही त्यांनी पकडून तत्काळ पोलिसांच्या हवाली केलंय. दोघंही आम्ही सलमान खानचे चाहते असल्याचं सांगत आहेत.

या दोन तरुणांनी फार्महाऊसला असलेल्या तारा तोडून गेटमध्ये प्रवेश करण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी फार्महाऊसच्या सुरक्षारक्षकांनी त्यांना पकडले. तेव्हा त्या दोन तरूणांनी आपली खरी ओळख लपवण्याच्या बहान्याने खोटी नावं सांगितली. खरी नावे अजेश कुमार ओम प्रकाश गीला आणि गुरू सेवक सिंग तेजा सिंग सिख (दोघेही रा.पंजाब) अशी असताना महेशकुमार रामनिवास व विनोदकुमार राधेशाम अशी आमची नावे असल्याचे सांगितले. तसंच, पंजाबचे राहणारे असतानाही त्यांनी आपण उत्तर प्रदेशचे रहिवासी असल्याचं सांगितले. मात्र, त्यांच्या बोलण्यावर सुरक्षा रक्षकांना संशय आल्याने पोलिसांना बोलावून या दोघा तरुणांना पोलिसांच्या ताब्यात दिलं.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR