24 C
Latur
Sunday, January 19, 2025
Homeक्रीडाश्रीलंका सर्वबाद १७१

श्रीलंका सर्वबाद १७१

बोल्टचे ३ बळी; परेराचे वेगवान अर्धशतक

बंगळुरू : विश्वचषकाच्या ४१व्या सामन्यात न्यूझिलंडने श्रीलंकेला ४६.४ षटकांत १७१ धावांत गुंडाळले. न्यूझिलंडचा संघ पराभवाची मरगळ झटकून ताजातवाना होऊन मैदानावर उतरला. न्यूझिलंडने श्रीलंकेविरुद्ध दर्जेदार गोलंदाजी केली. महिषा तीक्ष्णा आणि दिलशान मदुशंका यांनी दहाव्या विकेटसाठी विक्रमी भागीदारी करून श्रीलंकेला सन्मानजनक धावसंख्या उभारून दिली.

बंगळुरूच्या एम. चिन्नास्वामी स्टेडियमवर किवी संघाने नाणेफेक जिंकून गोलंदाजीचा निर्णय घेतला. श्रीलंकेचा सलामीवीर कुसल परेराने सर्वाधिक ५१ धावा केल्या. त्याने या विश्वचषकातील सर्वांत जलद अर्धशतक झळकावले. परेराने २२ चेंडूत आपले अर्धशतक पूर्ण केले. उर्वरित फलंदाजांना चांगली कामगिरी करता आली नाही. अखेरीस महिषा तीक्ष्णाने दिलशान मदुशंकासोबत १०व्या विकेटसाठी ४३ धावांची भागीदारी केली. किवी संघाकडून ट्रेंट बोल्टने ३ बळी घेतले. लॉकी फर्ग्युसन, मिचेल सँटनर आणि राचिन रवींद्र यांनी प्रत्येकी २ बळी घेतले.

पॉवर प्लेमध्ये श्रीलंकेचा निमा संघ पॅव्हेलियनमध्ये परतला. १० षटकांनंतर संघाची धावसंख्या ७४/५ होती.
अनुभवी अँजेलो मॅथ्यूज आणि धनंजया डी सिल्वा यांनी ३४ धावा जोडून डावाला आकार दिलाच होता. पण, मिचेल सँटनरच्या फिरकीवर मॅथ्यूज (१६) स्लीपमध्ये झेल देऊन माघारी परतला. पाठोपाठ सँटनरने धनंजयालाही (१९) माघारी पाठवून श्रीलंकेला सातवा धक्का दिला. फर्ग्युसनने त्याची दुसरी विकेट घेताना चमिरा करुणारत्नेला (६) बाद केले. सामन्याच्या दुस-याच षटकात टीम साऊदीच्या चेंडूवर टॉम लॅथमने कुसल परेराचा झेल सोडला.

जीवदान मिळाल्यानंतर कुसल परेराने शानदार फलंदाजी केली. त्याने टीम साऊदीच्या दुस-या षटकात २ चौकार आणि १ षटकार ठोकला. ५व्या षटकात ट्रेंट बोल्टने कुसल मेंडिस आणि सदिरा समरविक्रमाला बाद केले, पण परेराने लयीत फलंदाजी सुरूच ठेवली. त्याने टीम साऊदीच्या षटकात एक षटकार आणि ३ चौकार मारले. परेराने २२ चेंडूत अर्धशतक पूर्ण केले, जे या विश्वचषकातील सर्वांत जलद अर्धशतकही आहे. बोल्टने चरिथ असलंकाला तर फर्ग्युसनने परेराला पॅव्हेलियनचा रस्ता दाखवला. बोल्ट वर्ल्ड कपमध्ये ५० विकेट्स घेणारा किवींचा पहिला आणि जगातला सहावा गोलंदाज ठरला. लॉकी फर्ग्युसनने त्याच्या पहिल्याच षटकात न्यूझिलंडला विकेट मिळवून दिली. त्याने २८ चेंडूंत ९ चौकार व २ षटकारांसह ५१ धावा करणा-या परेराला माघारी पाठवले

दोन्ही संघांत प्रत्येकी एक बदल
दोन्ही संघांत प्रत्येकी एक बदल करण्यात आला. न्यूझिलंडने ईश सोधीच्या जागी लॉकी फर्ग्युसनला संधी दिली. तर श्रीलंकेने कसून रजिथाला बाहेर ठेवले असून चमिका करुणारत्नेचा संघात समावेश केला आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR