उमरगा येथे अनैतिक संबंधातून प्रियकराने केला एकाचा खून

उमरगा : प्रतिनिधी
रविवारी उमरगा शहर बायपास जवळच्या कोरेगाववाडी रस्त्यानजीक एका ३५ वर्षीय युवकाचा डोळ्यात मिरची पावडर टाकून दगडाने ठेचून खून करण्यात आला. या प्रकरणी अवघ्या १२ तासात उमरगा पोलिसांनी खून करणा-या दोन आरोपींचा शोध लावला. अनैतिक संबंधातून हा खून झाल्याचे पोलिसांनी सांगितले. या घटनेत शाहूराज महादू सूर्यवंशी वय ३५ असे मृत व्यक्तीचे नाव आहे.

रविवारी सकाळी कोरेगाववाडी रस्त्यावर एका अनोळखी व्यक्तीचा मृतदेह दिसून आल्याने, नागरिकांनी पोलिसांना कळविले. पोलिसांनी तात्काळ घटनास्थळाकडे धाव घेतली. यावेळी पोलीस उपविभागीय अधिकारी सदाशिव शेलार, पोलीस निरीक्षक प्रल्हाद सूर्यवंशी, सहाय्यक पोलिस निरीक्षक पांडुरंग कन्हेरे, पोलीस उपनिरीक्षक गजानन पुज्जरवाड, पोलिस कर्मचारी हजर झाले. पण मृतदेहचा चेहरा विद्रुप केल्याने ओळख पटत नव्हती. उपविभागीय पोलीस अधिकारी शेलार व पोलीस निरीक्षक सूर्यवंशी यांनी आपले कौशल्य पणाला लावत मयताची ओळख पटविण्यासाठी अनुभव पणास लावला.

शेजारील शेतकरी, नागरिक यांच्याशी संपर्क साधून तसेच मयताने परिधान केलेल्या शर्टाच्या टॅग वरून, तब्बल चार तासांनी अखेर मयताची ओळख पटविण्यात पोलिसांना यश आले. दरम्यान खून करणा-यांचा शोध घेण्यासाठी श्वान पथकास पाचारण करण्यात आले तर फॉरेन्सिक टीम सुद्धा घटनास्थळी उपस्थित झाली. वरिष्ठ पोलिस अधिकारी मेघना नागराज यांनी घटनास्थळाला भेट दिली. यानंतर पोलिसांनी तांत्रिक घटनाचे विश्लेषण करून, सिसिटीव्ही फुटेज, मोबाईल रेकॉर्ड आदींचा अभ्यास करून आरोपी शिवाजी दत्तू दूधनाळे वय ३२ यास रात्री उशीरा शेतातून शिताफीने ताब्यात घेतले आहे. तर पत्नी गौरी शाहूराज सूर्यवंशी वय ३४ हीला ही पोलिसांनी ताब्यात घेतले असून, आरोपीने गुन्हा कबूल केल्याचे पोलिसांनी सांगितले.

याबाबत अधिक माहिती देताना पोलिसांनी सांगितले की मयताची पत्नी गौरी व आरोपी शिवाजी यांचे अनैतिक संबंध होते. यामुळे शाहूराज व गौरी यांच्यात सतत भांडण व्हायचे. यामुळे शाहूराजचा कायमचा काटा काढण्यासाठी आरोपी शिवाजी व गौरी यांनी रविवारी पहाटे आरोपी शिवाजी याने मयत शाहूराज याला दारू पाजविली. रात्री दोन वाजण्याच्या सुमारास बायपास जवळच्या कोरेगाववाडी येथील रस्त्यावर नेऊन डोळ्यात मिरची पावडर घालून रस्त्यावर पाडले. नंतर संधी साधून आरोपी शिवाजी याने मयत शाहूराज याच्या डोक्यात हंटर व दगडाने जबर मारहाण केली. यात शाहूराज सूर्यवंशी याचा जागीच मृत्यू झाला. अशी माहिती पोलिस निरीक्षक प्रल्हाद सूर्यवंशी यांनी दिली.

Hot this week

नांदेडात एकाच दिवशी दोन अधिकारी निलंबित

नांदेड : महापलिकने हाती घेतलेल्या १०० दिवस विशेष कार्यक्रमात...

कोलकात्याकडून दिल्ली पराभूत

दिल्ली : कोलकाता नाईट रायडर्स टीम अखेर विजयी ट्रॅकवर...

यंदाही मुलींचीच बाजी

पुणे : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण...

कृषी विभागात किरण जाधव नावाचा नवीन आका

बीड : भाजप आमदार सुरेश धस यांनी कृषी विभागातील...

…म्हणून वाणीची एन्ट्री झाली

मुंबई : अजय देवगणचा नुकताच रेड २ रिलीज झाला....

Related Articles

EKMAT DIGITAL
Video thumbnail
Purna|आमदार रत्नाकर गुट्टे यांच्या वाढदिवसानिमित्त पूर्णा तालुक्यात विविध सामाजिक उपक्रम
02:40
Video thumbnail
Latur|वर्षानुवर्षे एकाच ठिकाणी कार्यरत अधिकारी-कर्मचाऱ्यांच्या बदल्यांसाठी संभाजी सेनेचे आंदोलन
03:44
Video thumbnail
Nanded|: 'गुंगी गुडिया' वक्तव्यावरून राष्ट्रवादी आक्रमक; हर्षवर्धन सपकाळांविरोधात जोडे मारो आंदोलन
03:29
Video thumbnail
Latur|जळकोट तालुक्यात जलस्रोत तुडुंब; पाण्याचा प्रश्न मिटला, शिवार हिरवाईने नटले
01:14
Video thumbnail
Solapur| मोहोळमध्ये संजय राऊत यांच्या प्रतिमेला दुग्धाभिषेक
01:19
Video thumbnail
Latur|नांदेड–बिदर महामार्गावरील सिमेंट रस्त्याला मोठ्या भेगा; अपघाताचा धोका
00:59
Video thumbnail
Latur|शिवराज पाटील चाकूरकर यांच्या भव्य स्मारकाची तयारी; चार दिवसांत मोठा निर्णय!
03:22
Video thumbnail
Nanded|धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्यावर राकेश टिकैतांचे मोठे वक्तव्य..
01:30
Video thumbnail
Latur|खरीप हंगामावर एल निनोचं सावट; शेतकऱ्यांची नजर आकाशाकडे
02:40
Video thumbnail
Latur|बोगस खत विकणाऱ्यांविरोधात शेतकऱ्यांचा एल्गार
04:25
Video thumbnail
Parbhani|परभणी-गंगाखेड महामार्गाच्या दर्जावर प्रश्नचिन्ह;202 कोटी खर्च करूनही महामार्गाची दुरवस्था
01:21
Video thumbnail
Nanded|नांदेड हादरलं! दहावीतील विद्यार्थ्याचा वर्गमित्रावर चाकू हल्ला
02:10
Video thumbnail
भूम तालुक्यातील आंबी जयवंतनगर मार्ग बंद;देवगावरोड वरील पूल गेला वाहून,अनेक गावांचा संपर्क तुटला
00:17
Video thumbnail
Nanded|हिमायतनगरमध्ये प्रशासनाचा बुलडोझर; उमर चौक अतिक्रमणमुक्त
01:29
Video thumbnail
Viral Video: सहस्त्रकुंड धबधब्याचा मन मोहून टाकणारा ड्रोन व्ह्यू
01:28

Latest news