‘गद्दारीचा शिक्का अंगावर…’ ठाकरेंची साथ सोडल्यानंतर ओमराजे निंबाळकर नेटकऱ्यांच्या निशाण्यावर

मुंबई: गेल्या दोन महिन्यांपासून महाराष्ट्राच्या राजकारणात चर्चेत असलेल्या ‘ऑपरेशन टायगर’ मोहिमेचा आज मोठा धक्कादायक निकाल समोर आला आहे. लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांनी ठाकरेसेनेतील फुटीर गटाच्या शिवसेनेतील (शिंदे गट) विलीनीकरणाला अधिकृत मान्यता दिली आहे. या राजकीय घडामोडीत धाराशिवचे खासदार ओमराजे निंबाळकर यांनी उद्धव ठाकरे यांची साथ सोडून शिंदे गटात प्रवेश केल्याने मोठी खळबळ उडाली आहे.

२०२४ च्या लोकसभा निवडणुकीत उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील ठाकरे गटाचे नऊ खासदार निवडून आले होते. त्यापैकी एक महत्त्वाचा चेहरा असलेले ओमराजे निंबाळकर, चार वर्षांपूर्वी पक्षात पडलेल्या फुटीनंतरही खंबीरपणे उद्धव ठाकरे यांच्यासोबत राहिले होते. शिंदे गटाकडून सुरू असलेल्या ‘ऑपरेशन टायगर’मध्ये ओमराजे सुरुवातीला ठामपणे ठाकरेंसोबत होते. त्यांच्या विरोधामुळेच ही मोहीम काही काळ लांबणीवर पडल्याची चर्चा होती. मात्र, आज त्यांनी घेतलेल्या निर्णयामुळे ठाकरे गटाला मोठा फटका बसला आहे.

ओमराजे निंबाळकर यांनी आपल्या अधिकृत सोशल मीडिया हँडलवरून या निर्णयाची माहिती देताच नेटकऱ्यांनी संताप व्यक्त करण्यास सुरुवात केली. त्यांच्या पोस्टवर कमेंट्सचा पाऊस पडला असून, अनेक वापरकर्त्यांनी त्यांच्यावर कडाडून टीका केली आहे. अनेक समर्थकांनी आपण त्यांच्याकडून ही अपेक्षा केली नव्हती आणि उद्धव ठाकरे यांच्यासोबतच राहायला हवे होते, अशी भावना व्यक्त केली आहे. संतप्त नेटकऱ्यांनी त्यांना आधी खासदारकीचा राजीनामा द्यावा आणि मग नैतिकतेच्या आधारावर पुन्हा निवडणूक लढवून निवडून दाखवावे, असे थेट आव्हान दिले आहे.

सोशल मीडियावर त्यांना ‘गद्दार’ असे संबोधले जात आहे. काही युजर्सनी त्यांना निष्ठावंत राहण्याचा सल्ला दिला होता, मात्र तो फोल ठरल्याची टीका होत आहे. एका नेटकऱ्याने तर अत्यंत टोकदार प्रतिक्रिया नोंदवताना म्हटले की, या निर्णयामुळे केवळ राजकारणच नाही, तर सामान्यांचा लोकशाहीवर आणि लोकांच्या चांगुलपणावरचा विश्वासही उडून जाईल. ओमराजे निंबाळकर यांचा हा निर्णय धाराशिवच्या राजकारणासाठी अत्यंत महत्त्वाचा मानला जात असून, ठाकरे गटाच्या खासदारांच्या गटात पडलेली ही फूट २०२६ मधील राजकीय समीकरणे बदलणारी ठरणार आहे. आता ओमराजे निंबाळकर या टीकेला कशा प्रकारे उत्तर देतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Hot this week

नांदेडात एकाच दिवशी दोन अधिकारी निलंबित

नांदेड : महापलिकने हाती घेतलेल्या १०० दिवस विशेष कार्यक्रमात...

कोलकात्याकडून दिल्ली पराभूत

दिल्ली : कोलकाता नाईट रायडर्स टीम अखेर विजयी ट्रॅकवर...

यंदाही मुलींचीच बाजी

पुणे : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण...

कृषी विभागात किरण जाधव नावाचा नवीन आका

बीड : भाजप आमदार सुरेश धस यांनी कृषी विभागातील...

…म्हणून वाणीची एन्ट्री झाली

मुंबई : अजय देवगणचा नुकताच रेड २ रिलीज झाला....

Related Articles

EKMAT DIGITAL
Video thumbnail
Purna|आमदार रत्नाकर गुट्टे यांच्या वाढदिवसानिमित्त पूर्णा तालुक्यात विविध सामाजिक उपक्रम
02:40
Video thumbnail
Latur|वर्षानुवर्षे एकाच ठिकाणी कार्यरत अधिकारी-कर्मचाऱ्यांच्या बदल्यांसाठी संभाजी सेनेचे आंदोलन
03:44
Video thumbnail
Nanded|: 'गुंगी गुडिया' वक्तव्यावरून राष्ट्रवादी आक्रमक; हर्षवर्धन सपकाळांविरोधात जोडे मारो आंदोलन
03:29
Video thumbnail
Latur|जळकोट तालुक्यात जलस्रोत तुडुंब; पाण्याचा प्रश्न मिटला, शिवार हिरवाईने नटले
01:14
Video thumbnail
Solapur| मोहोळमध्ये संजय राऊत यांच्या प्रतिमेला दुग्धाभिषेक
01:19
Video thumbnail
Latur|नांदेड–बिदर महामार्गावरील सिमेंट रस्त्याला मोठ्या भेगा; अपघाताचा धोका
00:59
Video thumbnail
Latur|शिवराज पाटील चाकूरकर यांच्या भव्य स्मारकाची तयारी; चार दिवसांत मोठा निर्णय!
03:22
Video thumbnail
Nanded|धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्यावर राकेश टिकैतांचे मोठे वक्तव्य..
01:30
Video thumbnail
Latur|खरीप हंगामावर एल निनोचं सावट; शेतकऱ्यांची नजर आकाशाकडे
02:40
Video thumbnail
Latur|बोगस खत विकणाऱ्यांविरोधात शेतकऱ्यांचा एल्गार
04:25
Video thumbnail
Parbhani|परभणी-गंगाखेड महामार्गाच्या दर्जावर प्रश्नचिन्ह;202 कोटी खर्च करूनही महामार्गाची दुरवस्था
01:21
Video thumbnail
Nanded|नांदेड हादरलं! दहावीतील विद्यार्थ्याचा वर्गमित्रावर चाकू हल्ला
02:10
Video thumbnail
भूम तालुक्यातील आंबी जयवंतनगर मार्ग बंद;देवगावरोड वरील पूल गेला वाहून,अनेक गावांचा संपर्क तुटला
00:17
Video thumbnail
Nanded|हिमायतनगरमध्ये प्रशासनाचा बुलडोझर; उमर चौक अतिक्रमणमुक्त
01:29
Video thumbnail
Viral Video: सहस्त्रकुंड धबधब्याचा मन मोहून टाकणारा ड्रोन व्ह्यू
01:28

Latest news