22.4 C
Latur
Monday, September 16, 2024
Homeक्रीडाधु्रव जुरेलची धडाकेबाज खेळी

धु्रव जुरेलची धडाकेबाज खेळी

रांची : इंग्लंडविरूद्धच्या रांची येथे खेळवण्यात येत असलेल्या चौथ्या कसोटी सामन्यात भारताने पहिल्या डावात ३०७ धावा केल्या. यामध्ये विकेटकिपर बॅट्समन ध्रुव जुरेलने ९० धावांची धडाकेबाज खेळी केली. यामुळे पहिल्या डावात इंग्लंडची आघाडी पन्नासच्या आत आली.

ध्रुव जुरेलने आठव्या विकेटसाठी कुलदीप यादवसोबत ७६ धावांची महत्वपूर्ण खेळी केली. ध्रुव जुरेलच्या या खेळीवर भारताचे माजी कर्णधार आणि समालोचक सुनिल गावसकर जाम खूष झाले. त्यांनी जुरेलची तुलना एमएस धोनीशी करत मोठे वक्तव्य केले. रांची कसोटीत समालोचन करताना सुनिल गावसकर यांनी ध्रुव जुरेलची तुलना महेंद्रसिंह धोनीशी केली. ते म्हणाले की, जुरेलचा प्रेजेंस ऑफ माईंड पाहून मला वाटते की तो पुढचा महेंद्रसिंह धोनी आहे. ध्रुव जुरेलने विकेटकिपिंगमध्ये देखील आपले चुणूक दाखवून दिली आहे.

त्याने राजकोट कसोटीत जबरदस्त विकेटकिपिंग केली होती. त्यानंतर रांचीत त्याने कुलदीपसोबत ७६ धावांची भागीदारी रचत भारताची सामन्यावर पुन्हा पकड निर्माण करून दिली. जुरेलने १० व्या विकेटसाठी देखील आकाशदीपसोबत ४० धावांची भागीदारी रचली.

जुरेलने धोनीला प्रश्न विचारला होता
ध्रुव जुरेलनेही महेंद्रसिंह धोनीला आपला आदर्श मानले आहे. आयपीएलदरम्यान तो अनेकदा माहीचा सल्ला घेताना दिसला आहे. ज्युरेलने यापूर्वी असेही सांगितले होते की, त्याने माही भाईला विचारले होते की, तू तुझ्या करिअरमध्ये ६ आणि ७ व्या क्रमांकावर जास्त फलंदाजी केली आहेस आणि तरीही तुझी कामगिरी उत्कृष्ट आहे याचे रहस्य काय आहे? मी माझ्या संघासाठी देखील हे करू शकतो का? ज्युरेलने सांगितले की, माही भाईने त्याला सांगितले होते की, त्यांच्या कामात यशापेक्षा अपयश जास्त आहेत, त्यामुळे इतका विचार करू नका. फिनिशर असण्याची एकच चांगली गोष्ट म्हणजे तुम्ही सर्वात वाईट अपेक्षा करा आणि त्यानुसार तयारी करा कारण तुम्ही सामना चांगला पूर्ण करू शकत नाही.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR