26.6 C
Latur
Thursday, July 3, 2025
Homeक्रीडाकोल्हापुरच्या स्वप्नील कुसाळेला कांस्य; भारताला तिसरे पदक

कोल्हापुरच्या स्वप्नील कुसाळेला कांस्य; भारताला तिसरे पदक

नवी दिल्ली : वृत्तसंस्था
पॅरिस ऑलिम्पिकमध्ये महाराष्ट्राचा नेमबाज स्वप्नील कुसाळेने ५० मीटर रायफल थ्री पोझिशनच्या प्रकारात कांस्य पदक पटकावले आहे. भारताचे पॅरिस ऑलिम्पिकमधील हे तिसरे कांस्य पदक आहे.

स्वप्नील कुसाळे हा महाराष्ट्रातील कोल्हापूर येथील कांबळवाडी गावातील असून तो २०१२ पासून आंतरराष्ट्रीय स्पर्धांमध्ये भारताचे प्रतिनिधित्व करत आहे. आता १२ वर्षांच्या प्रदीर्घ प्रतिक्षेनंतर स्वप्नील कुसाळेने ऑलिम्पिकमध्ये पदार्पण केले आहे.

महाराष्ट्राच्या खाशाबा जाधव यांनी १९५२ मध्ये हेलसिंकी आलिंम्पिकमध्ये देशाला कांस्यपदक मिळवून दिले होतं. ऑलिम्पिकमध्ये वैयक्तिक पदक जिंकणारे ते स्वतंत्र भारतातील पहिले खेळाडू होते. यानंतर आज त्यानंतर आज महाराष्ट्राच्या स्वप्निल कुसाळे याने कांस्य पदकावर मोहोर उमटवत पॅरिस ऑलिम्पिकमध्ये तिरंगा फडकावला आहे.

स्वप्निल कुसाळेने नेंिलग पोझिशन (गुडघे टेकून शुटींग करणे)च्या पहिल्या फेरीत ५०.८ गुण मिळवले. या फेरीत तो सातव्या स्थानी राहिला. त्यानंतर दुस-या फेरीत कुसळेची गुण संख्या १०१.७ झाली. यासह तो सहाव्या स्थानी पोहचला. याच प्रकारातील तिस-या फेरीत त्याने १०.५, १०.४, १०.३, १०.२ आणि १०.२ गुण नोंदवत सहावे स्थान काय ठेवले.

प्रोन पोझिशनच्या (झोपून शुटींग करणे) पहिल्या फेरीत जागतिक क्रमवारीत पहिल्या क्रमांकावर असलेल्या प्रिव्रतस्कीने अचूक स्कोअरसह सुरुवात केली. कुसळेने तीन वेळा १०.५ आणि दोन वेळा १०.६ गुण मिळवले. दुस-या फेरीतील एक शॉटमध्ये कुसाळेने १०.८ पर्यंत मजल मारली. पण तरीही तो या फेरी अखेर पाचव्या स्थानावर राहिला. त्यानंतर तिस-या फेरीत एकदा १०.५ दोनदा १०.४ गुण आणि एकदा १०.२ गुण मिळवले. याफेरी अखेरही स्वप्निल पाचव्या स्थानी राहिला.
स्वप्निलची स्टॅडींग पोझिशनच्या पहिल्या फेरीत खराब सुरुवात झाली. पहिलाच शॉटमध्ये त्याने केवळ ९.९ गुण मिळवले.

कुसाळेने पात्रता फेरीत नीलिंग पोझिशनमध्ये १९८ (९९, ९९) अशी कामगिरी केली होती. त्यानंतर प्रोनमध्ये १९७ (९८, ९९) व स्टँडिग पोझिशनमध्ये १९५ (९८, ९७) असे वेध घेतले होते. पात्रता फेरीतील ४४ स्पर्धकांमध्ये त्याने सातवे स्थान प्राप्त केले आणि याच बळावर तो फायनलमध्ये पोहोचला. या इव्हेंटमधील फायनल आज गुरुवारी झाली.

पात्रता फेरीत चीनच्या लिऊ युकूनने ५९४ गुणांसह पहिले स्थान संपादन केले तर नॉर्वेच्या जॉन हर्मन हेगने ५९३ अंकांसह दुसरे स्थान मिळवले होते. युक्रेनचा सर्हिय कुलिश ५९२ गुणांसह तिस-या स्थानी होता. फ्रान्सचा ल्युकास क्रिझिस व सर्बियाचा लॅझर प्रत्येकी ५९२ गुणांवर राहिला होता. पोलंडचा टॉमस्ज बॅर्टनिक ५९० गुणांसह सहाव्या स्थानी राहिला होता.

कुसाळेने ५९० गुणांसह सातवे तर झेक प्रजासत्ताकचा जिरी प्रिवरटस्कीने ५९० गुणांसह आठवे स्थान मिळवले.
स्वप्निलने यापूर्वी अनेक राष्ट्रीय- आंतरराष्ट्रीय स्पर्धांमध्ये अनेक पदके मिळवली आहेत. २०२० च्या टोकियो ऑलिम्पिकवेळी पात्रता फेरीतील त्याची संधी अगदी काठावर हुकली होती.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR