शिरूर अनंतपाळ : प्रतिनिधी
तालुक्यातील सावरगाव शिवारात शिवाजी तानाजी काळे वय २४ वर्षे रा. मुशीराबाद ता. जि. लातूर यांची शिरुर अनंतपाळ तालुक्यातील सावरगाव शिवारात शेती आहे. ते स्वत:च्या शेतात झोपले असता लहान भावाने मनात राग धरून डोक्यात कु-हाडीचे घाव घालून जागीच ठार केल्याची घटना दि. २ नोव्हेंबरच्या रात्री घडली असुन त्या बाबत शिरूर अनंतपाळ पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा दि. ३ नोव्हेंबर रोजी दाखल झाला आहे.
याबाबत शिरूर अनंतपाळ पोलीसा कडून मिळालेली माहिती अशी की लातूर तालुक्यातील मुशीराबाद येथील तानाजी काळे यांची शिरूर अनंतपाळ तालुक्यातील सावरगाव शिवारात स्वत:ची जमीन असून तानाजी काळे यांना दोन मुले होती. त्या पैकी मोठा मुलगा शिवाजी तानाजी काळे हा अविवाहीत असून हा सतत दारु पिऊन लहान मोठ्या चो-या करायचा व दिवसभर दारुच्या नशेत असायचा शिवाजी हा चोरी करीत असल्यामुळे सतत पोलीस व गावातील लोक तानाजी काळे रा. मुशीराबाद यांच्या घराकडे चौकशीला येत असत व घरच्या व्यक्तींना तुमचा मुलगा कुठे आहे सांगा, आमची चोरी केला आहे म्हणून भांडणे करीत असत त्यामुळे लोकांच्या व पोलीसी चौकशीला घरचे लोक त्रासुन गेले होते.
त्यामुळे त्रासाला कंटाळून लहान भाऊ बालाजी तानाजी काळे यांनी शेतात झोपलेल्या शिवाजी तानाजी काळे या मोठ्या भावाच्या डोक्यात कु-हाडीने वार करून जागीच ठार केल्याची घटना दि. २ नोव्हेंबरच्या रात्री ९.३० ते ११.३० च्या दरम्यान घडल्या मुळे मयताची बहीण अहिल्या जीतीन हुडे वय २८ वर्षे व्यवसाय-मजुरी रा. बागझरी ता. अंबाजोगाई जि. बिड हा.मु. मुशिराबाद ता. लातूर जि. लातूर यांच्या फिर्यादी वरून शिरुर अनंतपाळ पोलीस ठाण्यात गु.र.न. १९२/२०२३ कलम ३०२ भादवि प्रमाणे आरोपी बालाजी तानाजी काळे रा. मुशीराबाद ता. लातूर जि. लातुर याच्या विरुद्ध दि ३ नोव्हेंबर रोजी उशीरा गुन्हा दाखल करून आरोपीला अटक करण्यात आली असून खुनासाठी वापरण्यात आलेली कु-हाड जप्त करण्यात आली आहे. आरोपीने खुन केल्याची कबुली दिल्याचे पोलीसा कडून सांगण्यात आले. पुढील तपास पोलीस निरीक्षक विठ्ठल दराडे यांच्या मार्गदर्शना खाली पोलीस उपनिरीक्षक चंदनंिसह परिहार करीत आहेत.