39.6 C
Latur
Thursday, April 25, 2024
Homeराष्ट्रीयबदायूंमध्ये २ चिमुकल्यांची निर्दयी हत्या

बदायूंमध्ये २ चिमुकल्यांची निर्दयी हत्या

- आरोपी रक्तही प्यायला - साजिदचे पोलिसांनी केले एन्काऊंटर

बदायूं : उत्तर प्रदेशातील बदायूं जिल्ह्यातून एक हृदयद्रावक घटना समोर आली आहे. येथे दोन निष्पाप मुलांची गळा चिरून हत्या करण्यात आली आहे. पोलिसांनी या हत्याकांडातील आरोपीला चकमकीत ठार केले. दोन मुलांच्या हत्येनंतर जमाव संतप्त झाला. त्यांनी जाळपोळ आणि तोडफोडही केली. यानंतर, पोलिसांनी लवकरात लवकर दुसरा आरोपी असलेल्य जावेदचेही एन्काउंटर करावे, तेव्हाच मला न्याय मिळेल, असे आपल्या काळजाचे तुकडे गमावलेल्या आईने म्हटले आहे.

बदायूं येथील मंडई समिती पोलिस चौकीपासून ५०० मीटर अंतरावर असलेल्या बाबा कॉलनीत मंगळवारी सायंकाळी ७.३० वाजता कंत्राटदार विनोद ठाकूर यांची दोन मुले आयुष (१३) आणि आहान (६) यांची कु-हाडीने गळा चिरून निर्घृण हत्या केली. त्यांच्या घरासमोरील सलून चालवणा-या तरुणाने हे खून केले असून घटनेच्या तीन तासांनंतर पोलिसांनी आरोपीचे एन्काऊंटर करून ठार मारले. साजिद असे या आरोपीचे नाव होते.

बदायूंमधल्या या हत्याकांडाने संपूर्ण शहर हादरले आहे.
मंडी समिती चौकीजवळ नवीन बाबा कॉलनी विकसित झाली आहे. या वसाहतीत पाण्याच्या टाक्या बांधणारे कंत्राटदार विनोद कुमार हे कुटुंबासह राहतात. त्यांना तीन मुले आहेत. त्याची पत्नी ब्युटी पार्लरचे काम करते. साजिद आणि जावेद यांचे सलून यांच्या घराच्या समोर असून त्यांच्यात घरासारखे संबंध होते. आजारी बायकोसाठी पाच हजार रुपये पाहिजे अशी आरोपींनी मागणी केली. नंतर विनोदची पत्नी त्यांच्यासाठी घरात चहा करायला गेली असता, आरोपी साजिदने टेरेसवर जाऊन विनोद यांच्या दोन चिमुकल्यांचा गळा चिरून खून केला. विनोदचा मधला मुलगा हा आरोपीला पाणी देण्यासाठी गेला असता त्याने त्याच्यावर देखील वार केला तो ओरडत खाली आला. साजिद रक्ताने माखला होता. रस्त्यावरील लोकांनी त्याला पकडण्याचा प्रयत्न केला मात्र तो लोकांना ढकलून पळून गेला. यावेळी दुसरा आरोपी जावेद बाहेर बसला होता.

पोलिसांना या घटनेची माहिती देण्यात आली. पोलिस साजिद आणि जावेदच्या शोध घेऊ लागले. पोलिसांना साजिद जंगलात लपून बसल्याची माहिती मिळाली. पोलिसांनी त्याला पकडण्यासाठी नाकाबंदी केली. साजिदने पोलिसांवर गोळीबार केला. या चकमकीत एका पोलिस कर्मचा-याला गोळी लागली असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. प्रत्युत्तरादाखल पोलिसांनी देखील गोळीबार केला. त्यात साजिद ठार झाला आहे. जावेदचा शोध अद्याप सुरू आहे.

घटनेचा संबंध जादु-टोण्याशी ?
पीडित कुटुंबाने या संपूर्ण घटनाक्रमाला जादू-टोण्याशी जोडले आहे. एवढेच नाही, तर साजिदने हत्­या करून मुलांचे रक्तही प्यायले. त्याच्या तोंडाला मांसाचे तुकडे लागलेले होते, असा आरोपही त्यांनी केला आहे. पोलीस या आरोपांचा तपास करत आहे. घटनास्थळी मोठा पोलीस बंदोबस्त आहे.
जन्माला येताच मरण पावली होती साजिदची ५ मुले

या दुहेरी हत्याकांडामागे काही जादू-टोण्याचा प्रकार असू शकतो, अशी चर्चा परिसरात आहे. आरोपी साजिदने एकदा, आपली पाच मुले जन्माला येताच मरण पावली, एकही बचावले नाही, असे संगीताला सांगितले होते. आता पुन्हा जिल्हा महिला रुग्णालयात पत्नीची प्रसूती आहे. यासाठी त्याने संगीताकडून पाच हजार रुपयेही उसने घेतले होते.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR