40.6 C
Latur
Saturday, April 27, 2024
Homeक्रीडागिलच्या नेतृत्वाखाली गुजरात टायटन्स् प्रथमच खेळणार

गिलच्या नेतृत्वाखाली गुजरात टायटन्स् प्रथमच खेळणार

नवी दिल्ली : आएपीएल २०२४ सुरु होण्यासाठी आता फक्त २ दिवस उरले आहेत. आयपीएल २०२४ चा पहिला सामना २२ मार्चला खेळला जाणार आहे. यामुळे सर्वच संघ आएपीएलची ट्रॉफी जिंकण्यासाठी आपापली रणनीती बनवण्यात आणि मजबूत सरावा करण्यात व्यस्त आहेत. मात्र, प्रत्येक संघ खेळाडूंच्या दुखापतींनी त्रस्त आहे. गुजरात टायटन्सचा पहिला सामना २४ मार्च रोजी लखनौविरुद्ध होणार आहे. यावेळी गुजरात टायटन्स पहिल्यांदाच युवा फलंदाज शुभमन गिलच्या नेतृत्वाखाली खेळणार आहे.

गुजरात टायटन्सचा माजी कर्णधार अष्टपैलू हार्दिक पांड्या या मोसमात मुंबई इंडियन्समध्ये सामिल झाला असून त्याला मुंबई इंडियन्सने कर्णधारपदही बहाल केले आहे. तर या हंगामात नवा गुजरातला नवा कर्णधार शुभमन गिलच्या नेतृत्वाखाली खेळावे लागणार आहे. गुजरात टायटन्सच्या प्लेइंग ११ बद्दल बोलायचे तर, वृध्दिमान साहा कर्णधार शुभमन गिलसह संघासाठी डावाची सुरुवात करताना दिसू शकतो. यानंतर केन विल्यमसन तिस-या क्रमांकावर आणि साई सुदर्शन चौथ्या क्रमांकावर खेळताना दिसेल. विल्यमसनला गेल्या वर्षी दुखापत झाली होती, मात्र आता तो तंदुरुस्त असून संघात सामील झाला आहे. त्याच्या पुनरागमनामुळे गुजरात टायटन्स संघ मजबूत झाला आहे.

गुजरात टायटन्सचे संभाव्य प्लेइंग ११
शुभमन गिल (कर्णधार), वृद्धिमान साहा (यष्टीरक्षक), साई सुदर्शन, केन विल्यमसन, डेव्हिड मिलर, शाहरुख खान, राहुल तेवतिया, रशीद खान, मोहित शर्मा, उमेश यादव आणि स्पेन्सर जॉन्सन.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR