29.1 C
Latur
Monday, May 20, 2024
Homeमहाराष्ट्रविद्यार्थ्यांना घेऊन जाणा-या बसचा अपघात, १ ठार, पाच जखमी

विद्यार्थ्यांना घेऊन जाणा-या बसचा अपघात, १ ठार, पाच जखमी

अलिबाग : बुलडाणा जिल्ह्यातील चिखली येथून रायगड किल्ल्याकडे सहलीला जाणा-या महाविद्यालयीन विद्यार्थ्यांच्या बसला खोपोलीजवळ अपघात झाला. यात एकाचा मृत्यू झाला असून चार ते पाच जण किरकोळ जखमी झाले आहेत.

मुंबई-पुणे महामार्गावर खोपोली एक्झिटजवळ ही दुर्घटना सकाळी सातच्या सुमारास घडली. चालकाचे गाडीवरील नियंत्रण सुटल्याने बस रस्त्याखाली खडकाळ भागात जाऊन आदळली. या दुर्घटनेत गाडीच्या क्लीनरचा मृत्यू झाला. चालक व इतर चार ते पाच विद्यार्थी किरकोळ जखमी झाले आहेत.

घटनेची माहिती मिळताच पोलिस, स्थानिक बचाव पथके आणि अपघातग्रस्तांसाठी असलेल्या मदत पथकांनी घटनास्थळी धाव घेतली. बसमधील ४९ विद्यार्थी आणि प्राध्यापकांना सुखरूप बाहेर काढले. त्यांना गगनगिरी महाराज मठात नेऊन प्राथमिक उपचार केले. बसमधील सर्व विद्यार्थी सुखरूप असल्याची माहिती प्रशासनाने दिली.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR