22.3 C
Latur
Sunday, September 8, 2024
Homeअंतरराष्ट्रीयपाकिस्तानी मतदारांनी दहशतवाद नाकारला!

पाकिस्तानी मतदारांनी दहशतवाद नाकारला!

इस्लामाबाद : पाकिस्तानमध्ये सार्वत्रिक निवडणुकांचे निकाल जाहीर केले जात आहेत. पीटीआय समर्थित उमेदवार आणि नवाझ शरीफ यांच्या पीएमएल-एन यांच्यात लढत पाहायला मिळत आहे. दहशतवादी हाफिज सईदमुळे भारतीयांनाही या निवडणुकीत उत्सुकता लागल्याचे पाहायला मिळत आहे. सईदचा पक्ष पाकिस्तानी मरकझी मुस्लिम लीगने अनेक जागांवर आपले उमेदवार उभे केले होते.

यापैकी एका जागेवर हाफिज सईदचा मुलगा तल्हा सईदही होता. या निवडणुकीत तल्हा सईद याचा दारूण पराभव झाला. सईद लाहोरच्या एनए-१२२ जागेवरून उमेदवार होता पण पाकिस्तानच्या मतदारांनी दहशतवादाला नकार देत त्याचा पराभव केल्याचे दिसून येत आहे.

निकालात तल्हा सहाव्या क्रमांकावर राहिला. त्याला केवळ २,०४२ मते मिळाली. तल्हाचा पराभव करणा-या नेत्याचे नाव लतीफ खोसा असून ते पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान यांचे निकटवर्तीय मानले जातात. लाहोरच्या या जागेवरून लतीफ खोसा यांनी १ लाखांहून अधिक मतांनी विजय मिळवला आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR