22.8 C
Latur
Wednesday, September 10, 2025
Homeराष्ट्रीयसी.पी. राधाकृष्णन देशाचे नवे उपराष्ट्रपती

सी.पी. राधाकृष्णन देशाचे नवे उपराष्ट्रपती

राधाकृष्णन ठरले देशाचे १७ वे उपराष्ट्रपती पहिल्या पसंतीची ४५२ मते रेड्डी यांना मिळाली ३०० मते

नवी दिल्ली : पराष्ट्रपती पदाच्या निवडणुकीत राष्ट्रीय लोकशाही आघाडी अर्थात एनडीएचे उमेदवार सी.पी. राधाकृष्णन हे विजयी झाले आहेत. त्यामुळे ते आता भारताचे १७ वे उपराष्ट्रपती ठरले आहेत. त्यांनी विरोधकांच्या इंडिया आघाडीचे उमेदवार बी. सुदर्शन यांना पराभूत केले आहे. उपराष्ट्रपती पदासाठी मंगळवार दि. ९ सप्टेंबर रोजी मतदान प्रक्रिया पार पडली. सी.पी.राधाकृष्णन यांना पहिल्या पसंतीचे ४५२ मते मिळाली. तर बी. सुदर्शन रेड्डी यांना पहिल्या पसंतीची ३०० मते मिळाली.

भारतीय संसदेत लोकसभा आणि राज्यसभेसह एकूण ७८८ खासदार आहेत. सध्या दोन्ही सभागृहात ७ जागा रिक्त आहेत. अशाप्रकारे, एकूण ७८१ खासदारांना मतदान करायचे होते, त्यापैकी १३ जणांनी मतदानात भाग घेतला नाही. यामध्ये बीआरएसचे ४, बीजेडीचे ७, अकाली दलाचे १ आणि १ अपक्ष खासदाराने मतदान केले नाही. तर ४२७ एनडीए खासदारांनी मतदान केले. या निवडणुकीत एकूण ७६८ खासदारांकडून मतदान झाले. उपराष्ट्रपती निवडणुकीसाठी मतदान मंगळवारी सकाळी १० वाजता सुरू झाले आणि संध्याकाळी ५ वाजता संपले. मतदान संपल्यानंतर, काँग्रेसने सांगितले की उपराष्ट्रपती निवडणुकीत विरोधी पक्षात एकजूट राहिली. सर्व ३१५ खासदारांनी मतदान केले आहे.

सी.पी. राधाकृष्णन हे महाराष्ट्राचे राज्यपाल आहेत. तमिळनाडूत जन्मलेले सी.पी. राधाकृष्णन भाजपाचे मोठे नेतेही आहेत. त्यांचा जन्म ४ मे १९५७ रोजी तिरुपूर येथे झाला. वयाच्या १६ व्या वर्षापासून राष्ट्रीय स्वयंसेवक संघ तसेच जनसंघासाठी त्यांनी कार्य सुरु केले होते. ते कोइमतूर मतदारसंघातून १९९८ आणि १९९९ मध्ये लोकसभेवर दोनदा निवडून गेले होते. भाजपचे तमिळनाडू प्रदेशाध्यक्ष म्हणूनही त्यांनी काम पाहिले आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR