18.1 C
Latur
Wednesday, November 27, 2024
Homeअंतरराष्ट्रीयदहशतवादी पन्नूच्या धमकीवर कॅनडाची कारवाई

दहशतवादी पन्नूच्या धमकीवर कॅनडाची कारवाई

ओटावा : खलिस्तानी दहशतवादी गुरपतवंत सिंग पन्नू याने एअर इंडियाचे विमान उडवून देण्याची धमकी दिल्याच्या प्रकरणाची चौकशी सुरु झाली आहे. कॅनडाने कारवाई करत या प्रकरणाचा तपास सुरु केला आहे. विशेष म्हणजे, कॅनडाचे वाहतूक मंत्री पाब्लो रॉड्रिग्ज यांचे वक्तव्यही समोर आले आहे.

ओटावा येथे पत्रकारांशी बोलताना ते म्हणाले की, १९ नोव्हेंबर रोजी एअर इंडियाच्या विमानात बॉम्बस्फोट घडवून आणण्याची धमकी देणारा व्हीडीओ समोर आल्यानंतर देशाच्या रॉयल कॅनेडियन माउंटेड पोलिसांनी या प्रकरणाचा तपास सुरु केला होता. आम्ही प्रत्येक धोक्याला गांभीर्याने घेतो, विशेषत: जेव्हा त्यात एअरलाइनचा समावेश असतो. या प्रकरणावर, भारतीय परराष्ट्र मंत्रालयाने गुरुवारी सांगितले की, भारत सरकार आपल्या देशात अतिरेकी घटकांना जागा देऊ नये यासाठी परदेशी सरकारांवर दबाव आणत राहील. ंिहसाचाराला चिथावणी देणा-या कट्टरतावादी आणि दहशतवादी घटकांबाबत सरकार परदेशी सरकारांच्या संपर्कात आहे.

एअर इंडियाचे विमान उडवून देण्याची धमकी
४ नोव्हेंबरला खलिस्तान समर्थक नेते गुरपतवंत सिंग पन्नू याने एक व्हीडीओ जारी केला होता आणि धमकी दिली होती की, १९ नोव्हेंबरला एअर इंडियाच्या फ्लाइटमध्ये लोकांनी प्रवास करु नये, कारण एअर इंडियाचे फ्लाइट उडवून दिले जाईल. शीखांना संबोधित करताना पन्नू म्हणाला होता की, त्यांनी १९ नोव्हेंबर रोजी एअर इंडियाच्या विमानाने प्रवास करु नये, कारण त्यांच्या जीवाला धोका आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR