21.1 C
Latur
Sunday, January 19, 2025
Homeमहाराष्ट्रफटाक्यांच्या ठिणगीमुळे उमेदवाराचे जळाले केस

फटाक्यांच्या ठिणगीमुळे उमेदवाराचे जळाले केस

कल्याण : महाराष्ट्रात सध्या विधानसभा निवडणुकांचा रणसंग्राम सुरू झाला आहे. येत्या २० नोव्हेंबर रोजी राज्यात एकाच टप्प्यात निवडणुका पार पडत आहेत. तर २३ नोव्हेंबर रोजी महाराष्ट्र विधानसभा निवडणुकांचे निकाल जाहीर होणार आहेत. विधानसभा निवडणुकांचा प्रचार अंतिम टप्प्यात आला आहे. त्यातच आता कल्याणमध्ये एक मोठी दुर्घटना घडली आहे. कल्याण पश्चिमेत प्रचार रॅलीदरम्यान फटाके फोडणे एका उमेदवाराच्या जीवाशी बेतल्याचे पाहायला मिळाले. यामुळे एका उमेदवाराच्या डोक्यावरचे केस जळाले.

विधानसभा निवडणुकांचा प्रचाराचा आज शेवटचा दिवस आहे. मात्र कल्याण पश्चिम मतदारसंघात काल जिजाऊ विकास पार्टीचे उमेदवार राकेश मुथा हे प्रचार करत होते. यावेळी काही हौशी कार्यकर्त्यांनी केलेल्या एका घटनेमुळे त्यांच्या जीवावर बेतले.

जिजाऊ विकास पार्टीचे उमेदवार राकेश मुथा हे प्रचार करत असताना भोईरवाडी परिसरात त्यांच्या स्वागतासाठी भव्य दीडशे किलो वजनाचा हार तयार करण्यात आला होता. हा हार क्रेनच्या साहाय्याने त्यांच्या गळ्यात घालण्यात आला. या हारासोबत काही इलेक्ट्रिक स्पार्कर्स फटाके लावण्यात आले होते. अचानक या फटाक्यांची ठिणगी मुथा यांच्या डोक्यावर उडाली.

यानंतर क्षणार्धात राकेश मुथा यांच्या केसांनी पेट घेतला. यानंतर उपस्थित कार्यकर्त्यांनी तात्काळ हस्तक्षेप करून ही आग विझविली. यामुळे सुदैवाने मोठी दुर्घटना टळली. तसेच कोणतीही जीवितहानी झाली नाही. प्रचाराच्या शेवटच्या दिवशी उमेदवारांच्या स्वागतासाठी कार्यकर्त्यांचा अतिरेकी उत्साह हा कशाप्रकारे धोका निर्माण करू शकतो, याचा जिवंत पुरावा यामुळे मिळाला.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR