26.3 C
Latur
Sunday, May 25, 2025
Homeक्रीडाकॅप्टन धोनीचा झटका, गुजरातचा ८३ धावांनी धुव्वा

कॅप्टन धोनीचा झटका, गुजरातचा ८३ धावांनी धुव्वा

अहमदाबाद : महेंद्रसिंह धोनी याच्या नेतृत्वात चेन्नई सुपर किंग्सने आयपीएलच्या १८ व्या मोसमातील मोहिमेचा अप्रतिम शेवट केला आहे. सीएसकेने अहमदाबादमधील नरेंद्र मोदी स्टेडियममध्ये झालेल्या ६७ व्या सामन्यात यजमान गुजरात टायटन्सचा ८३ धावांनी धुव्वा उडवत चौथा विजय मिळवला. चेन्नईने गुजरातला विजयासाठी २३१ धावांचे अवघड आव्हान दिले होते. मात्र चेन्नईच्या गोलंदाजांसमोर गुजरातला पूर्ण २० ओव्हरही खेळता आले नाही. गुजरातचा डाव १८.३ ओव्हरमध्ये १४७ रन्सवर आटोपला.

चेन्नईने यासह हा सामना जिंकला. तर प्लेऑफसाठी क्वालिफाय झालेल्या आणि टॉप २ च्या शर्यतीत असलेल्या गुजरातला मोठा झटका लागला. गुजरातच्या या पराभवामुळे आता पंजाब किंग्ससह मुंबई इंडियन्स या दोन्ही संघांना टॉप २ मध्ये पोहचण्याची संधी आहे. सोमवारी २६ मे रोजी पंजाब विरुद्ध मुंबई सामना होणार आहे.

चेन्नईच्या गोलंदाजांनी २३१ या विजयी धावांचा पाठलाग करणा-या गुजरातला सुरुवातीपासूनच झटके दिले. गुजरातला ठराविक अंतराने झटके दिल्याने त्यांच्या एकाही खेळाडूला डोंगराएवढ्या आव्हानाचा पाठलाग करताना मोठी खेळी करणे शक्य झाले नाही. कॅप्टन शुबमन गिल १३ आणि जोस बटलर याने ५ धावा केल्या. तर शेरफेन रुदरफोर्ड याला भोपळाही फोडता आला नाही. गुजरातचे टॉप ३ फलंदाज ढेर झाले. त्यामुळे गुजरातची स्थिती ३ आऊट ३० झाली. मात्र मॅचविनर साई सुदर्शन मैदानात असल्याने गुजरातला दिलासा होता.

साई आणि शाहरुख खान या दोघांनी गुजरातचा डाव सावरला. या जोडीने चौथ्या विकेटसाठी अर्धशतकी भागीदारी केली. या जोडीकडून गुजरातला आशा होता. मात्र रवींद्र जडेजा याने ही चौथ्या विकेटसाठी झालेली ५५ धावांची भागादारी फोडली. जडेजाने शाहरुख खान याला १९ धावांवर आऊट केले. साईकडून आशा होत्या. मात्र साई आऊट होताच सर्व आशा संपल्या. साईने ४१ रन्स केल्या. त्यानंतर एक एक करुन गुजरातचे फलंदाज आऊट झाले.

राशिद खान याने १२ धावा केल्या. गेराल्ड कोएत्झी ५ रन्सवर माघारी परतला. राहुल तेवतिया १४ रन्सवर आऊट झाला. अर्शद खान याने २० धावा करुन पराभवातील अंतर कमी केले. तर आर साई किशोर आऊट होताच गुजरातचा डाव आटोपला आणि चेन्नईने या हंगामातील चौथा विजय मिळवला. चेन्नईसाठी अंशुल कंबोज आणि नूर अहमद या दोघांनी सर्वाधिक प्रत्येकी ३ विकेट्स मिळवल्या. रवींद्र जडेजाने दोघांना मैदानाबाहेरचा रस्ता दाखला. तर खलील अहमद आणि मथीशा पथीराणा या दोघांनी प्रत्येकी १-१ विकेट घेतली.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR