27.1 C
Latur
Sunday, January 19, 2025
Homeमहाराष्ट्रकार-ट्रकचा अपघात, नाशिकचे ५ जण ठार

कार-ट्रकचा अपघात, नाशिकचे ५ जण ठार

नाशिक : मनमाड-येवला राज्य महामार्गावर स्विफ्ट कार आणि ट्रकचा भीषण अपघात झाला असून कारमधील सर्व पाच जणांचा जागीच मृत्यू झाल्याची घटना घडली. अंकाईजवळील रेल्वे उड्डाणपुलावर हा अपघात घडला. अपघातातील सर्व प्रवासी हे नाशिकमधील गंगापूरचे आहेत.

रोहित धनवटे, श्रेयस धनवटे, ललित सोनवणे, गणेश सोनवणे, प्रतीक नाईक असे अपघातात ठार झालेल्या तरुणांचे नाव असून पाचही तरुण नाशिकचे रहिवाशी आहेत. मनमाड जवळच्या म्हसोबा देवस्थान येथे धार्मिक कार्यक्रम उरकून येवलामार्गे नाशिककडे परतत असताना हा भीषण अपघात झाला. अपघातात कार अक्षरश: चक्काचूर झाली. सर्व मृतदेह शवविच्छेदनासाठी मनमाडच्या उपजिल्हा रुग्णालयात ठेवण्यात आले आहेत. या अपघाताच्या वेळी अवकाळी पाऊस आणि रात्रीच्या अंधारामुळे मदतकार्य राबविण्यास अडथळा येत होता. त्यामुळे वाहतूक दुतर्फा ठप्प झाली होती.

सोलापूरजवळ बसची चाके निखळली
सोलापूर-धुळे राष्ट्रीय महामार्गावरून धावणा-या एसटी बसला अपघात झाला. या एसटी बसचे मागचे चाकं निखळले. मात्र, सुदैवाने या बसमधील प्रवाशांचे प्राण वाचले. सोलापुरातील उळे-कासेगाव येथे हा थरार अनेक प्रवाशांनी आज अनुभवला. अपघातात सात ते आठ प्रवासी जखमी झाले आहेत.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR