यवतमाळ : कोणत्या जातीमध्ये किती टक्के लोकसंख्या आहे, हे कळणे गरजेचे आहे. मराठा समाजाचे म्हणने आहे की ते ३५ टक्के आहेत. त्याप्रमाणे इतर समाजांच्या लोकांना विचारले तर ते वेगवेगळी आकडे देतात. त्यामुळे या आरक्षणाचा वाद मिटवायचा असेल तर ज्या जातीची जेवढी टक्केवारी आहे, तेवढे आरक्षण त्या त्या जातीला द्यावे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा (आरएसएस) जातीनिहाय जनगणनेला विरोध असला तरी जातीनिहाय जनगणना झाली पाहिजे. अशी आरपीआयची (आरपीआय) भूमिका असल्याचे केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी सांगितले.
आरक्षणाचा वाद मिटवायचा असेल तर ज्या जातीची जेवढी टक्केवारी आहे, तेवढे आरक्षण त्या त्या जातीला द्यावे, अशी मागणीही आठवलेंनी केली. मराठा आरक्षणाला आपला विरोध नसून मराठा समाजातील गोरगरिबांना ज्यांचे उत्पन्न ८ लाखांच्या आत आहे. त्यांना आरक्षणाचा लाभ मिळाला पाहिजे. अशी आमची भूमिका असल्याचे आठवले म्हणाले.
अशी आमची नवी मागणी आहे. असा जर निर्णय समजा झाला तर लोकसंख्येच्या आधारे आमची टक्केवारी १५ टक्के होती. त्याआधारे आम्हाला १५ टक्के आरक्षण मिळत आहे. महाराष्ट्रात आमची १३ टक्के लोकसंख्या असल्याने १३ टक्के आरक्षण आम्हाला मिळत आहे. त्याच धर्तीवर इतर समाजाला मिळत असेल तर आम्हाला आनंद आहे. अशी भूमिका केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी स्पष्ट केली.