25.7 C
Latur
Thursday, September 19, 2024
Homeराष्ट्रीयमोइत्रा यांच्या विरोधात सीबीआय चौकशीचे आदेश; दुबे यांचा दावा

मोइत्रा यांच्या विरोधात सीबीआय चौकशीचे आदेश; दुबे यांचा दावा

नवी दिल्ली : गेल्या काही दिवसांपासून महुआ मोईत्रा हे नाव चर्चेत आले आहे. तृणमूल काँग्रेसच्या खासदार महुआ मोईत्रा यांच्यावर कॅश फॉर क्वेरी अर्थात संसदेत प्रश्न विचारण्यासाठी पैसे घेतल्याचा आरोप करण्यात आला आहे. यासंदर्भात महुआ मोईत्रा यांची चौकशी चालू असून त्यांनी हे सर्व आरोप फेटाळून लावले आहेत. आता भाजप खासदार निशिकांत दुबे यांनी बुधवारी या प्रकरणात नवीन दावा केला आहे. ते म्हणाले की, लोकपालांनी महुआ मोईत्रा यांच्याविरोधात सीबीआय चौकशीचे आदेश दिले आहेत.

निशिकांत दुबे यांनी सोशल मीडियावर लिहिले की, आज माझ्या तक्रारीवरून लोकपालाने आरोपी खासदार महुआ मोईत्रा यांच्या राष्ट्रीय सुरक्षा गहाण टाकून केलेल्या भ्रष्टाचाराची सीबीआय चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत. दुबे यांनी अलीकडेच मोईत्रा यांनी उद्योगपती दर्शन हिरानंदानी यांच्याकडून पैसे घेतल्याचा आरोप केला होता. अदानी समूह प्रकरणाबाबत पैसे घेऊन संसदेत प्रश्न उपस्थित केल्याचा आरोप दुबे करत आहेत. तसेच या प्रकरणातील तथ्यांची तपासणी केली जात असून सत्य अद्याप समोर आलेले नाही. या पार्श्वभूमीवर महुआ मोईत्रा यांच्यावर जय अनंत देहादराय यांनी गंभीर आरोप केले आहेत. यासंदर्भात त्यांनी पोलिसांत तक्रारही दाखल केल्यामुळे मोईत्रा यांच्यासमोरील अडचणी वाढण्याची शक्यता आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR