केंद्रीय पथकाकडून सोलापूर जिल्ह्यातील दुष्काळी परिस्थितीची प्रत्यक्ष पाहणी, शेतक-यांची संवाद

सोलापूर :  प्रतिनिधी
केंद्र शासनाच्या केंद्रीय पथकाने सोलापूर जिल्ह्यातील दुष्काळी परिस्थितीची प्रत्यक्ष पाहणी करून पीक नुकसान, पिण्याच्या पाण्याची टंचाई, भूजल पातळी, जनावरांसाठी चारा व पाण्याची उपलब्धता तसेच रब्बी हंगामाच्या शक्यतांचा आढावा घेतला. उत्तर सोलापूर तालुक्यातील बेलाटी, मंगळवेढा तालुक्यातील विविध गावांमध्ये पथकाने शेतक-यांशी संवाद साधून दुष्काळामुळे झालेल्या नुकसानीची माहिती जाणून घेतली. पावसातील दीर्घ खंडामुळे तूर व अन्य पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले असून, काही भागांतील विहिरी आणि साठवण तलाव कोरडे पडल्याचे निदर्शनास आले.

चारा व पाण्याच्या टंचाईमुळे पशुपालन व्यवसायावरही गंभीर परिणाम झाला आहे. या पार्श्वभूमीवर शेतक-यांनी शासनाकडून जास्तीत जास्त आर्थिक मदत वेळेत मिळावी, अशी मागणी केंद्रीय पथकाकडे केली.
केंद्रीय पथकाचे नेतृत्व कृषी व शेतकरी कल्याण विभागाच्या पीक विभागाचे संचालक डॉ. के. पोनुसामी यांनी केले. पथकामध्ये पेयजल व स्वच्छता विभागाचे टीम लीडर अबसार अहमद खान आणि अन्न व सार्वजनिक वितरण विभागाचे सहायक संचालक सुमित शर्मा यांचा समावेश होता. पथकप्रमुख डॉ. के. पोनुसामी यांनी शेतक-यांशी संवाद साधून पीक पद्धती, पावसाची स्थिती, झालेला आर्थिक खर्च आणि आगामी रब्बी हंगामातील नियोजन याबाबत माहिती घेतली.

यानंतर केंद्रीय पथकाने मंगळवेढा शिवारातील शेतीपिकांची पाहणी केली. आमदार समाधान आवताडे यांनी मंगळवेढा मतदारसंघात पाऊस न झाल्यामुळे शेतीपिकांचे झालेले नुकसान आणि निर्माण झालेल्या दुष्काळी परिस्थितीची माहिती पथकाला दिली. आंधळगाव येथे पथकाने बंद पडलेल्या हातपंपाची, तसेच मका आणि भुईमूग पिकांची पाहणी केली. गावातील बहुतांश पिकांचे नुकसान झाल्याची माहिती यावेळी देण्यात आली. येथील विहिरींच्या भूजल पातळीची पाहणी करताना विहिरींनी तळ गाठल्याचे पथकाच्या निदर्शनास आले.

आंधळगाव शिवारातील दादोसा जतकर यांच्या शेतातील पावसाअभावी करपलेल्या डाळिंब पिकाची तसेच दत्तात्रय जतकर यांच्या शेतातील पाण्याची पातळी संपलेल्या शेततळ्याची पथकाने पाहणी केली. यावेळी शेतक-यांशी संवाद साधून पाणीटंचाईमुळे शेती आणि उत्पन्नावर झालेल्या परिणामांची माहिती घेण्यात आली. चा-याची उपलब्धता कमी झाली असून, चा-याचे दर प्रति टन सुमारे ४ हजार ५०० ते ५ हजार रुपयांपर्यंत वाढल्याची माहिती त्यांनी दिली. जनावरांना पिण्यासाठी पाणी मिळविण्यातही अडचणी येत आहेत. ही परिस्थिती अशीच राहिल्यास पुढील दोन महिन्यांत पाणीटंचाईमुळे गावातील नागरिकांना स्थलांतर करावे लागू शकते, अशी भीतीही त्यांनी व्यक्त केली.

यानंतर पथकाने गोणेवाडी गावाला पाणीपुरवठा करणा-या सार्वजनिक विहिरीची पाहणी केली. विहिरीतील भूजल पातळी अत्यंत खालावल्याने गावाला टँकरद्वारे पाणीपुरवठा सुरू असल्याची माहिती संबंधित अधिका-यांनी पथकाला दिली. त्यानंतर पथकाने वाकी-घेरडी परिसरातील फळबागा, वांगी आणि ऊस पिकांची पाहणी केली. दुष्काळामुळे पिकांची झालेली दयनीय अवस्था शेतक-यांनी पथकाच्या निदर्शनास आणून दिली. पाणीटंचाई आणि पावसाच्या अभावामुळे शेती उत्पादनावर मोठा परिणाम झाला असून, आगामी हंगामाबाबतही शेतक-यांमध्ये चिंता असल्याचे यावेळी सांगण्यात आले.

पाहणीदरम्यान संबंधित गावांतील तलाठी, ग्रामसेवक आणि कृषी सहाय्यक यांनी पीक परिस्थिती, पाणीटंचाई, जनावरांसाठी चारा व पिण्याच्या पाण्याची उपलब्धता तसेच नागरिकांच्या पिण्याच्या पाण्याची सद्यस्थिती याबाबत केंद्रीय पथकाला माहिती दिली. या पाहणी दौ-यावेळी राज्याचे कृषी आयुक्त सुरेश मांढरे, जिल्हाधिकारी एस. कार्तिकेयन, मंगळवेढ्याचे आमदार समाधान आवताडे, कृषी सहसंचालक सुभाष काटकर, कृषी विज्ञान केंद्राचे वरिष्ठ शास्त्रज्ञ लालासाहेब तांबडे, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी शुक्राचार्य भोसले, निवासी उपजिल्हाधिकारी अभिजीत पाटील, जिल्हा परिषद सदस्य पृथ्वीराज माने, प्रांताधिकारी सदाशिव पडदुने, उत्तर सोलापूरचे तहसीलदार निलेश पाटील, तालुका कृषी अधिकारी रामचंद्र माळी, मंगळवेढ्याचे उपविभागीय अधिकारी अमित माळी, मंगळवेढ्याचे तहसीलदार मदन यादव, सांगोल्याच्या तहसीलदार बाळूबाई भागवत, संबंधित तालुका कृषी अधिकारी तसेच विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते.

बेलाटी येथे तूर पिकाचे नुकसान; रब्बी हंगामाचीही चिंता
केंद्रीय पथकाने उत्तर सोलापूर तालुक्यातील बेलाटी येथील शेतकरी सुभाष जाधव यांच्या शेताला भेट देऊन नुकसानग्रस्त पिकाची पाहणी केली. जूनअखेर पेरणी झाल्यानंतर पाऊस न झाल्याने परिसरात पावसाचा सुमारे ३८ दिवसांचा खंड पडला. परिणामी, तूर पीक पूर्णपणे नष्ट झाली आहे.
– सुभाष जाधव, शेतकरी

तूर पिकासाठी एकरी सुमारे २१ हजार रुपये खर्च
सामान्य परिस्थितीत त्यांच्या शेतातून तुरीचे १० ते १२ टन उत्पादन मिळते; मात्र यंदा उत्पादन मिळण्याची शक्यता नसल्याचे त्यांनी सांगितले. तूर पिकासाठी एकरी सुमारे २१ हजार रुपये खर्च झाला असून, आठ जनावरे असलेल्या त्यांच्या कुटुंबाकडे केवळ महिनाभर पुरेल एवढाच चारा शिल्लक आहे. आता पाऊस झाला तरी हातचे पीक वाचणार नसून, रब्बी हंगामातील पिके घेणेही शक्य होणार नसल्याची व्यथा त्यांनी मांडली.

चारा व पाणीटंचाईमुळे पशुपालन व्यवसाय अडचणीत
केंद्रीय पथकाने गोणेवाडी येथील गोट फार्मला भेट देऊन दुग्ध व्यवसायाची स्थिती जाणून घेतली. या फार्मच्या पशुपालकाकडे २८ गायी असून, दुष्काळामुळे जनावरांसाठी चारा आणि पाणी मिळविणे कठीण झाल्याचे त्यांनी सांगितले. पूर्वी दररोज सुमारे १५० लिटर दूध उत्पादन होत होते; मात्र आता ते घटून ८० लिटरवर आले आहे.

पाच वर्षांत प्रथमच वाणीचिंचोळीचा साठवण तलाव कोरडा
केंद्रीय पथकाने वाणीचिंचोळी येथील साठवण तलावाची पाहणी केली. जलसंपदा विभागाच्या अधिका-यांनी हा तलाव गेल्या पाच वर्षांत प्रथमच पूर्णपणे कोरडा पडल्याची माहिती दिली. पावसाअभावी जलसाठे आटल्याने परिसरातील पाणी उपलब्धतेवर गंभीर परिणाम झाल्याचे यावेळी स्पष्ट झाले.

दुष्काळग्रस्त शेतक-यांना वेळेत मदत देण्याची मागणी
केंद्रीय पथकाच्या पाहणीदरम्यान विविध गावांतील शेतक-यांनी पीक नुकसान, पिण्याच्या पाण्याची टंचाई, जनावरांसाठी चारा व पाण्याची कमतरता आणि घटलेले उत्पन्न याबाबत आपली परिस्थिती मांडली. पावसाअभावी खरीप पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले असून, रब्बी हंगामही हातचा जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे शासनाने दुष्काळग्रस्त शेतक-यांना जास्तीत जास्त आर्थिक मदत द्यावी आणि ती वेळेत उपलब्ध करून द्यावी, अशी मागणी करण्यात आली.

Hot this week

नांदेडात एकाच दिवशी दोन अधिकारी निलंबित

नांदेड : महापलिकने हाती घेतलेल्या १०० दिवस विशेष कार्यक्रमात...

कोलकात्याकडून दिल्ली पराभूत

दिल्ली : कोलकाता नाईट रायडर्स टीम अखेर विजयी ट्रॅकवर...

यंदाही मुलींचीच बाजी

पुणे : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण...

कृषी विभागात किरण जाधव नावाचा नवीन आका

बीड : भाजप आमदार सुरेश धस यांनी कृषी विभागातील...

…म्हणून वाणीची एन्ट्री झाली

मुंबई : अजय देवगणचा नुकताच रेड २ रिलीज झाला....

Related Articles

EKMAT DIGITAL
Video thumbnail
LIVE -लातूर जिल्हा बँक निवडणुकीत सहकार पॅनलचा शंखनाद! बाबासाहेब पाटील, धीरज देशमुख मैदानात
01:40:24
Video thumbnail
LIVE "लातूर बँकेत मोठी राजकीय खेळी! बाबासाहेब पाटील अन् धीरज देशमुख एकत्र!"
01:03:28
Video thumbnail
Mahur|एमटीडीसी रस्ते बांधकामावर भीषण दुर्घटना | २० वर्षीय मजुराचा मिक्सर मशीनखाली मृत्यू
01:33
Video thumbnail
Latur|कुरियर बॉक्स स्फोटातील नागनाथ स्वामी यांचा मृत्यू | पाच दिवसांची झुंज संपली
02:44
Video thumbnail
Latur|मनपात स्वच्छता कर्मचाऱ्यांचे ठिय्या आंदोलन | किमान वेतन आणि दिवाळी बोनसची मागणी
03:57
Video thumbnail
Latur Diwali Travel Ticket Rates|खासगी बसकडून अवाजवी तिकीट दर आकारल्यास तक्रार करा | RTO चे आवाहन
02:55
Video thumbnail
Latur Loan Recovery|कर्जवसुलीच्या छळातून आत्महत्येचा आरोप; सावकार शहाणवाज पठाण अटकेत
03:39
Video thumbnail
Nanded Loan Recovery|दुष्काळात कर्जवसुलीला छावा संघटनेचा विरोध | चिंचोली गावातील घटना
04:55
Video thumbnail
Latur|कुरियर बॉक्स स्फोट प्रकरणात बंदूक घर मालकाला अटक | दोन कुरियर चालक आरोपी
02:25
Video thumbnail
Latur News|गांधी चौक पोलिसांनी शोधले १४ हरवलेले मोबाईल | CEIR पोर्टलची मदत
02:23
Video thumbnail
Latur News : मालमत्ता कर थकबाकीदारांवर मनपाची कडक कारवाई; 80% सवलतीचा आज शेवटचा दिवस
01:52
Video thumbnail
Latur Police Action mod| गंजगोलाईत वाहतूक कोंडी रोखण्यासाठी पोलिसांचा रूट मार्च
05:39
Video thumbnail
Latur Hockey News : राज्यस्तरीय स्पर्धेस पात्र मुलींच्या हॉकी संघाला ‘माझं लातूर’चे पाठबळ
02:03
Video thumbnail
Latur Bus Stand : बसस्थानकातील सुरक्षेवरून महिला शिवसैनिक आक्रमक; पोलीस नियुक्तीची मागणी
01:39
Video thumbnail
Latur News : लातुरात गोवा बनावटीच्या दारूचा पर्दाफाश; 19 लाखांचा मुद्देमाल जप्त
03:38

Latest news