22.3 C
Latur
Sunday, September 8, 2024
Homeसोलापूरराहुरी घटनेच्या निषेधार्थ बार्शीत वकिलांचे साखळी उपोषण

राहुरी घटनेच्या निषेधार्थ बार्शीत वकिलांचे साखळी उपोषण

बार्शी : अहमदनगर जिल्ह्यातील राहुरी न्यायालयात वकिली व्यवसाय करणाऱ्या राजाराम आढाव व त्यांची पत्नी मनीषा या दाम्पत्याचे अपहरण करून निर्घृण हत्या केल्याच्या घटनेचा बार्शीतील वकिलांकडून निषेध व्यक्त करत तहसील कार्यालयासमोर साखळी उपोषण सुरू करण्यात आले.

अलीकडे वकील बांधवांवर प्राणघातक हल्ल्याच्या घटना वाढल्या आहेत. वकिलांवर अन्याय, हत्या, अत्याचार, प्राणघातक हल्ल्यांना प्रतिबंध करण्यासाठी वकील संरक्षण कायदा मंजूर व्हावा व दोषीवर कठोर कारवाई करण्यात यावी, यासाठी हे साखळी उपोषण सुरू करण्यात आल्याचे सांगण्यात आले.

बार्शी वकील संघाने या घटनेचा तीव्र निषेध नोंदविला. यावेळी काका गुंड, वैशाली दळवी, संभाजी गलांडे, प्रवीण करंजकर, गणेश भालेकर, जे.बी. जाधवर, एम.बी. धारूरकर, सुदर्शन सोनवणे, श्रीकांत पाटील, रवींद्र वैद्य, नितीन शिंदे, अविनाश गायकवाड, वासुदेव ढगे, शिवाजी जाधवर, संभाजी पाटील, एम.पी.बस आदी वकील बांधव उपस्थित होते.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR