24.6 C
Latur
Monday, January 20, 2025
Homeमहाराष्ट्रराज्य मागासवर्ग आयोगाचे अध्यक्ष राजीनामा देण्याच्या तयारीत

राज्य मागासवर्ग आयोगाचे अध्यक्ष राजीनामा देण्याच्या तयारीत

कामकाजात दोन मंत्री, न्यायमूर्ती दिलीप भोसले हस्तक्षेप करत असल्याचा आरोप

पुणे : राज्य मागासवर्ग आयोगात राजीनाम्यांचे सत्र सुरूच आहे. महिनाभरात आयोगातील चार सदस्यांनी राजीनामा दिला आहे. आता पाचवा राजीनामा देखील लवकरच दिला जाणार असल्याची माहिती समोर येत आहे. राज्य मागासवर्ग आयोगाचे अध्यक्ष न्यायमूर्ती आनंद निरगुडे पदाचा राजीनामा देण्याच्या तयारीत असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

आयोगाच्या बैठकीतील वैचारिक मतभेदांमुळे आतापर्यंत चार सदस्यांनी राजीनामा दिला आहे. मात्र आता अध्यक्षांच्या राजीनाम्याच्या बातमीमुळे अनेक चर्चांना उधाण आले आहे. राज्य मागासवर्ग आयोगाचे अध्यक्ष न्यायमूर्ती आनंद निरगुडे पदाचा राजीनामा हे कामकाजात सरकारमधील मंत्र्यांच्या लुडबुडीमुळे देत आहेत. ओबीसी आयोगाच्या कामकाजात राज्य सरकारमधील दोन मंत्री आणि न्यायमूर्ती दिलीप भोसले हस्तक्षेप करत असल्याने आपण राजीनामा देण्याचा निर्णय घेतल्याचे निरगुडे यांचे म्हणणे आहे. यामुळे मराठा आरक्षणासाठी दाखल करण्यात आलेल्या क्युरिटिव्ह पिटिशनसाठी आवश्यक ती माहिती गोळा करण्यास वेळ लागू शकतो.

सरकारकडून आयोगाच्या सदस्यांवर दबाव
राज्य मागासवर्ग आयोग हा मागासवर्गातील जातीची माहिती गोळा करण्यासाठी आहे. राज्य मागासवर्ग आयोग हा स्वायत्त आहे. आयोग हा स्वायत्त आहे पण माहिती देण्यासाठी आयोगावर सरकारकडून दबाव टाकण्यात आल्याचे सदस्यांचे म्हणणे आहे. सर्वेक्षणातून आलेली माहिती आम्ही तुम्हाला देऊ शकतो, परंतु सरकारला अपेक्षित माहिती देणे आम्हाला शक्य नाही. जी माहिती आमच्याकडे आहे तीच माहिती पुरवू शकतो, असे आयोगाच्या सदस्यांचे म्हणणे आहे. आयोगाच्या कामकाजासाठी एक व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप बनवण्यात आलेला आहे. या ग्रुपमधील सदस्यांना निरगुडे यांनी राजीनाम्याचे संकेत दिले आहेत.

राज्य सरकारमधील दोन मंत्री कोण?
राज्य मागासवर्ग आयोगाच्या कामावर दबाव असल्यामुळे मी राजीनामा दिला. बा शक्तींचा दबाव आयोगावर आहे. राज्य मागासवर्ग आयोग अजेंड्यावर चालत नाही, अशी स्पष्टोक्ती लक्ष्मण हाके यांनी केली. अध्यक्षांचे देखील हेच म्हणणे आहे, त्यामुळे आयोगावर दबाव टाकणारे मंत्री कोण या चर्चांना उधाण आले आहे. राज्य सरकारमधील हे दोन मंत्री मोठे असून लवकरच त्यांची नावे समोर येतील.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR