मुंबई : गेल्या अनेक वर्षांपासुन छत्रपती संभाजी महाराजांच्या जीवनावर आधारित छत्रपती संभाजी हा सिनेमा रखडला होता. पण आता छत्रपती संभाजी सिनेमाच्या प्रदर्शनाचा मार्ग मोकळा झाला आहे.
स्वराज्याच्या रक्षणासाठी चंदनापरी देह झिजवणारे धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज हे रणांगणावरचे अस्सल शेर होते. याच स्वराज्याच्या लढवय्यावर आधारित छत्रपती संभाजी सिनेमा अखेर रिलीज होणार आहे.
‘परफेक्ट प्लस एंटरटेनमेंट’ आणि ‘एजे मीडिया कॉर्प’ प्रस्तुत ‘छत्रपती संभाजी’ हा चित्रपट मराठी, हिंदी, तमिळ, तेलगू आणि इंग्रजी मध्ये एकाच वेळी प्रदर्शित होत आहे.
‘छत्रपती संभाजी’ चित्रपटाची सहनिर्मिती एफआयएफ निर्मिती संस्थेची आहे. कथा सुरेश चिखले यांची आहे. अविनाश विश्वजित, गुरु शर्मा आणि आरव यांचे संगीत चित्रपटाला लाभले असून पार्श्वसंगीत अमर-अमित देसाई यांनी दिले आहे. छायांकन सुरेश देशमाने तर संकलन भरत भाई यांचे आहे. कला अनिल वठ यांची आहे. साहसदृश्ये पी. सतीश यांची आहेत.