25.8 C
Latur
Friday, December 27, 2024
Homeक्रीडाचेन्नईचा सलग दुसरा पराभव

चेन्नईचा सलग दुसरा पराभव

हैदराबाद : अभिषेक शर्माची स्फोटक खेळी आणि एडन मार्करमच्या सावध खेळीने चेन्नईच्या शिलेदारांना पराभवाची धूळ चारली. आपल्या घरच्या मैदानावर खेळत असलेल्या सनरायझर्स हैदराबादने ४ गडी राखून विजय मिळवला. चेन्नईने दिलेल्या १६६ धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना यजमानांनी चांगली सुरुवात केली. सलामीवीर अभिषेक शर्माने १२ चेंडूत ३७ धावा कुटल्या आणि पाहुण्यांना घाम फोडला. अभिषेकला बाद करण्यात दीपक चाहरला यश आले पण तोपर्यंत यजमान मजबूत स्थितीत पोहोचले होते. मग एडन मार्करमने अर्धशतकी खेळी करून संघाच्या विजयात हातभार लावला. अखेर हैदराबादच्या संघाने १८.१ षटकांत ४ बाद १६६ धावा करून ६ गडी आणि ११ चेंडू राखून विजय मिळवला.

चेन्नईकडून मोईन अलीने सामन्यात रंगत आणली पण तो देखील संघाला विजय मिळवून देऊ शकला नाही. हैदराबादकडून ट्रॅव्हिस हेड (३१), अभिषेक शर्मा (३७), एडन मार्करम (५०), शाहबाज अहमद (१८), हेनरिक क्लासेन (नाबाद १० धावा) आणि नितीश रेड्डीने नाबाद (१४) धावा केल्या. चेन्नईकडून मोईन अली (२) तर महेश तीक्ष्णा आणि दीपक चाहर यांना प्रत्येकी १-१ बळी घेण्यात यश आले.

तत्पुर्वी, प्रथम फलंदाजी करताना चेन्नईच्या संघाने निर्धारित २० षटकांत ५ बाद १६५ धावा केल्या होत्या. यजमान हैदराबादकडून भुवनेश्वर कुमार, पॅट कमिन्स, शाहबाज अहमद, टी नटराजन आणि जयदेव उनाडकट यांनी प्रत्येकी १-१ बळी घेतला. गोलंदाजांनी केलेल्या सांघिक खेळीच्या जोरावर यजमानांनी सामन्यात पुनरागमन केले. चेन्नईकडून शिवम दुबेने सर्वाधिक धावा केल्या, त्याने ४ षटकार आणि २ चौकारांच्या मदतीने २४ चेंडूत ४५ धावा कुटल्या, तर रचिन रवींद्र (१२), ऋतुराज गायकवाड (२६), अंिजक्य रहाणे (३५) आणि डेरिल मिचेल (१३) धावा करून बाद झाला. रवींद्र जडेजा (३१) आणि महेंद्रसिंग धोनी (१) धावा करून नाबाद परतला.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR