नाशिक : प्रतिनिधी
नाशिक लोकसभा मतदारसंघात मोठा ट्विस्ट आला आहे. कारण एकीकडे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे सुपुत्र श्रीकांत शिंदे यांनी खासदार हेमंत गोडसे यांची उमेदवारी जाहीर केली असताना, तिकडे छगन भुजबळ हेच महायुतीचे उमेदवार असतील हे समोर आले आहे.
नाशिक लोकसभेबाबात महायुतीतील शिवसेना आणि भाजप यांच्यात चढाओढ सुरु होती. मात्र आता छगन भुजबळ यांच्या नावावर एकमत झाले असून, त्यांच्याच नावावर शिक्कामोर्तब झाले आहे. नाशिकच्या जागेसाठी शिवसेना आणि भाजपमध्ये चढाओढ सुरु होती. मात्र त्यात राष्ट्रवादी काँग्रेसने बाजी मारल्याचे चित्र आहे.
महायुतीतील दोन महत्वाच्या जागांचा तिढा होता तो सुटला आहे. नाशिकच्या जागेवर राष्ट्रवादीच्या छगन भुजबळांची वर्णी लागली. तर साता-याच्या जागेवर उदयनराजे भाजपच्याच तिकिटावर लढणार आहेत. साता-याच्या जागेच्या बदल्यात उदयनराजेंची राज्यसभेची जागा राष्ट्रवादीला मिळणार आहे. उरलेल्या दोन वर्षांसाठी राष्ट्रवादीचा उमेदवार राज्यसभेवर जाणार आहे.