38.8 C
Latur
Saturday, April 27, 2024
Homeक्रीडाशुभमन गीलला १२ लाखांचा दंड

शुभमन गीलला १२ लाखांचा दंड

नवी दिल्ली : वृत्तसंस्था
गुजरात टायटन्सच्या कप्तान शुभमन गिलवर बुधवारी चेन्नई सुपर किग्स विरुद्धच्या सामन्यात एक चूक महागात पडली आहे. या सामन्यात स्लो ओव्हर रेटसाठी गिल दोषी आढळून आल्याने त्याला १२ लाख रुपयांचा दंड ठोठावण्यात आला आहे.

चेन्नई सुपर किंग्ज आणि गुजरात टायटन्स यांच्यात मंगळवारी २६ मार्च रोजी झालेल्या सामन्यात गुजरात टायटन्सचा कर्णधार शुभमन गिलने एक चूक केली. त्यामुळे त्याच्यावर १२ लाख रुपयांचा दंड ठोठावण्यात आला आहे. ते चेन्नई सुपर किंग्जविरुद्ध स्लो ओव्हर रेटसाठी तो दोषी आढळला आहे.

आयपीएल २०२४ मधीस हा पहिला स्लो ओव्हररेट दंड असून याप्रकरणी आयपीएलने एक निवेदन जारी केले आहे. आयपीएलच्या निवेदनात म्हंटले आहे की, गुजरात टायटन्सचा कर्णधार शुभमन गिल याला चेन्नईच्या एमए चिदंबरम स्टेडियमवर २६ मार्च रोजी चेन्नई सुपरकिंग्स विरुद्धच्या सामन्या दरम्यान स्लो रेटसाठी हा दंड ठोठावण्यात आला आहे. सध्या शुभमन गिलला फक्त दंड ठोठावण्यात आलाय परंतु आगामी सामन्यांमध्ये पुन्हा याच कारणासाठी दोषी आढळला तर त्याच्यावर एक सामना न खेळण्याची बंदी होऊ शकते.

शुभमन गिल आयपीएलमध्ये पहिल्यांदा एका संघाची कप्तानी करत आहेत. शुभमन गिलच्या गुजरात टायटन्सने पहिल्याच सामन्यात मुंबई इंडियन्सचा पराभव करत विजयाचे पहिले खाते उघडले होते. मात्र मंगळवारी चेन्नई सुपरकिंग्स संघाने गुजरात टायटन्सचा ६३धावांनी पराभव केला.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR