33.5 C
Latur
Friday, May 9, 2025
Homeछत्रपती संभाजीनगरछत्रपती संभाजीनगर सज्ज!

छत्रपती संभाजीनगर सज्ज!

यंत्रणा अलर्ट मोडवर ब्लॅकआऊटची तयारी पूर्ण

छत्रपती संभाजीनगर : पहलकाम हल्ल्यानंतर भारत पाकिस्तान मध्ये तणावाची परिस्थिती निर्माण झाली आहे. या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात ब्लॅक आऊट करण्याची आवश्यकता भासल्यास यंत्रणा अलर्ट राहावी यासाठी जिल्हा प्रशासनाच्या वतीने तयारी करण्यात आली आहे. वरिष्ठांकडून ब्लॅक आऊट च्या सूचना आल्यानंतर ५ मिनिटांत शहरातील सर्व वीजपुरवठा खंडित होईल. ब्लॅक आउट सारखी परिस्थिती निर्माण झाल्यास यंत्रणा सज्ज राहावी यासाठी जिल्हाधिका-यांनी बैठक घेतली आहे.

भारत पाकिस्तान युद्ध सज्जतेच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यामध्ये मॉक ड्रिल झाली नसली तरी काळजी घेणे आवश्यक आहे. सुरक्षा विभागाने दिलेल्या माहितीनुसार सुरक्षेच्या दृष्टीने छत्रपती संभाजीनगर जिल्हा तिस-या टप्प्यात आहे. या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासनाच्या वतीने सर्व विभागांना सतर्क राहण्याच्या सूचना करण्यात आल्या आहेत. केंद्र सरकारच्या माध्यमातून ब्लॅकआऊट करण्याच्या सूचना आल्या तर कुठली काळजी घेतली पाहिजे या संदर्भात माहिती देण्यात आली. ब्लॅकआउटच्या वेळी सर्वात महत्त्वाची भूमिका असते ती महावितरणची. यामुळे त्यांची बैठक घेण्यात आली आहे. सूचना येतात ५ मिनिटांत सर्व वीज पुरवठा बंद करणे याबाबत नागरिकांमध्ये माहिती पोहोचवण्याच्या सूचना करण्यात आल्या आहेत.

आपत्कालीन परिस्थितीसाठी यंत्रणा सज्ज
आपत्कालीन परिस्थितीमध्ये जिल्ह्यातील सर्व यंत्रणा अलर्ट मोडवर आहेत. पोलिस दलातील सर्व अधिकारी कर्मचारी यंत्रणा सज्ज, सायरन सिस्टीम, अग्निशामक विभाग, आरोग्य यंत्रणा, औषध साठा यासह सर्व यंत्रणा अलर्ट मोडवर आहेत.

सर्व नागरिक सतर्क
जिल्ह्यामध्ये ब्लॅकआउट होणार या संदर्भात जिल्हा प्रशासनाच्या वतीने वेगवेगळ्या माध्यमातून माहिती नागरिकांपर्यंत पोहोचवली जाईल. शत्रूने हवाई हल्ला केल्यास सतर्कतेसाठी इशारा देणारे सायरन वाजवले जाईल. यावेळी नागरिकांनी तातडीने सर्व विद्युत उपकरणे बंद करावी. लाईट सुरू राहिल्यास हवेतून हल्ला करणा-या शत्रूंना टार्गेट निश्चित करण्यास मदत होईल यामुळे लाईट बंद करावे. नागरिकांनी शक्य असेल अशा जवळच्या इमारतीखाली असलेल्या पार्किंग मध्ये एकत्र यावे अशी काळजी घ्यावी. असा आवाहन करण्यात आले आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR